Posts

Showing posts from 2012

New poem created by me

कण कण वाढत असतात क्षण हे आयुष्याचे गत काळाची प्रसंग पूसून वारे धावती बदलाचे सार संपून जाव वाटत, अशी विषण्णता येते सार थांबून ठेवाव वाटत, अशी अनुकुलता होते पण .... क्षण हा थांबत नाही कधी काळासोबत चालत जातो आयुष्याच्या वाटेवरती उजेड-अंधार होतच राहतो काळाचे हे गणित सारे कुणावाचुन अडत  नसते चढ-उताराच्या रस्त्याने आयुष्य देखील सरकत असते सगळ काही थांबत नाही, साचून काही राहत नसते परिवर्तनाच्या वरदानाने किनारा गवसण्याची आशा असते  " हे ही दिवस जातील .." या विश्वासने वाटचाल करू दुखाच्या काळी विश्वास अन् आनंदात भान राखु आयुष्यासोबत नेहमी आपण पुढे जात राहायला हव भूतकाळाचे बोट सोडून येणार्‍या ऋतुच स्वागत करायला हव आणि साचलेपणा येऊ न देता परिवर्तन घडवायला हव -हर्षल कन्सारा

Mauritius Passes Bill on Spoken Sanskrit

Image