Posts

Showing posts from March, 2022

प्रदीपराव केतकर - प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

Image
परवा सकाळी नाशिकच्या एका संघ कार्यकर्त्याचा फोन आला, मा. प्रदीपराव केतकर यांचे निधन झाल्याचे कळले. ऐकून खूप वाईट वाटले. गेल्या ३-४ महिन्यांपासून कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अखेरीस संपुष्टात आली.  थोडा वेळ शांत चित्ताने विचार केल्यावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाचे प्रदीपराव माझ्यासाठी एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. जळगांवला इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना माझी काही हक्काची घरं होती, अर्थात अजूनही आहेत! त्यातील एक घर म्हणजे केतकरांचे! प्रत्येकवेळी भेटीत प्रेमाने विचारपूस करणे, सणवाराला आवर्जून घरी जेवायला बोलावणे, ज्यामुळे घराची, कुटुंबाची कमी जाणवली नाही. अशी काळजी ते नेहमीच घेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी नाळ जुळली ती कायमचीच!  प्रदीपराव आयकर विभागात एक अधिकारी होते, अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिक, अशीच त्यांची ओळख. आयकर विभागातील लोकांना कितिशा संधी मिळतात, आपली व कुटुंबाची वैयक्तिक प्रगती करण्याची!! परंतु अशा अनेक संधी झुगारून त्यांनी आपली कारकीर्द पार पडली होती, ही त्यांची विशेषता! संघाचा कार्यकर्ता व्यवहारी आयुष्यात कसा असावा ह