Posts

Showing posts from February, 2013
Image

उठा, जागे व्हा !

Image
                ' युवक ' हा शब्द कानी पडताच डोळ्यासमोर येते ते चैतन्य , उत्साह , साहस , प्रचंड कार्यक्षमता आणि उर्जा. इतिहासाची पाने चाळली असता या साहसी , उत्साही,चैतन्यदायी युवकांनीच घडविलेला क्रांतिदायी इतिहास आपणास वाचायला मिळतो. ही युवकांमध्ये असलेली ताकतच समाजाच्या उत्थानासाठीचा आशेचा किरण आहे. या युवाशक्तीमुळेच जगातील अनेक मोठे कार्य पार पडले व याच्या आभावामुळे अनेक कार्य अपुर्णच राहीली असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जवळील काळातील उदाहरण घ्यायचे म्हटले तर गेल्या दोन वर्षांपुर्वी झालेली इजिप्तमधील क्रांती ही आपण सर्वांनीच पाहिली आहे. ही ऐतिहासीक  क्रांती ज्या समाजामुळे घडली त्यात तरुणांचा सक्रिय सहभाग अधिक होता व त्यामुळेच तेथील समाज अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून/हुकूमशाहीतून मुक्त होऊ शकला हे सार्या जगाने पाहीले आणि मान्य सुध्दा केले.                 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ; तंत्रज्ञान विकसित करणे,त्यात दैनंदिन नाविण्य आणणे व त्याचा अधिकाधिक वापर हे तरुणच करतात. त्यामुळे तरुण म्हणजे नवे , नवा विचार , नविन दृष्टिकोन असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अ