Posts

Showing posts from December, 2014

सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा….

Image
       कधी कधी थोडे इतिहासात डोकावून पाहिले की काही गोष्टी अधिक स्पष्ट होतात. भारतावर मोहम्मद घोरी नावाच्या आक्रमकाने इ. स. 1100-1200 च्या काळात आक्रमण केले होते, राजा पृथ्वीराज चौहान त्यावेळी भारताचा सम्राट  होता. घोरीने पहिली स्वारी केली अनेक सैनीक, प्रचंड शस्त्रबळा सहीत, परंतू राजा पृथ्वीराज चौहनही काही कमी शूर नव्हता, त्याने घोरीच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पराभव केला व मोहम्मद घोरीला तलवारीच्या धारेवर धरले. आणि अचानक त्याच क्षणी घोरीला त्याच्या चूकांचा पश्चाताप झाला, त्याने त्वरीत राजा पृथ्वीराज चौहानची माफी मागून घेतली, आणि आमच्या राजाने युद्धधर्माचे पालन करित त्यास सहानुभूती दर्शवीत जिवंत सोडून दिले. परंतू पुन्हा आक्रमण नाही करणार तो मोहम्मद घोरी कसला. त्याने पुन्हा सैन्य, शस्त्र जमवीले, पुन्हा आक्रमण केले. राजा पृथ्वीराजने त्यास पुन्हा पराभूत केले आणि परभूत  होताच क्षणी घोरीस पुन्हा चुक केल्याचा पश्चाताप झाला, त्याने पुन्हा माफी मागितली आणि आमच्या राजानेही त्यास पुन्हा माफ करुन जिवंत सोडून दिले. असे एक वेळेला नाही, दोन वेळेला नाही तर तब्बल सोळा वेळी घडले. प्रत्येक पराभव

जनता माफ नही करेगी…

Image
    'सर्व धर्म समभाव' आणि 'व्यक्ती स्वातंत्र्य' ही भारतीय संविधानाची दोन मुलभूत पैलू आहेत. यावर आक्षेप घेणारा नेहमी गुन्हेगारच ठरतो. मग तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा, पक्षाचा असो, सत्ताधारी असो वा विरोधीपक्षाचा असो… संविधानाविरोधी आवाज म्हणजेच देशविरोधी आवाज, असच आमच्या देशात आजतागायत मानले गेले आहे. सध्या संसदेत असेच एक वादळ उठले आहे, वादळ आहे धर्मांतरणाचे… हे वादळ संसदेत कदाचीत उठलेही नसते, जर धर्मांतरण करणारा गट हिंदू असता, परंतू धर्मांतरण हे मुस्लिम कुटुंबीयांचे झाले आहे, त्यामुळे "आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत", असे मुस्लिम गटाला दाखविण्याची केविलवाणी धडपड सेक्युलर मन्डळींची सुरु आहे. आणि यात मिडिया सुद्दा मागे नाही, जणू देशात पहिल्यांदाच लोकं एका धर्मातून दुसर्या धर्मात गेले कि काय असे वातावरण मिडियाने तयार केले आहे.     देशात घडलेल्या कुठल्याही घटनेला सरकारच जबाबदार असते का…? ज्याअर्थी विरोधीपक्षांनी हा मुद्दा संसदेत उचलला आहे त्याअर्थी असेच वाटते, आणि जर का हे खरे असेल तर ही घटना ज्या राज्यात घडली त्या राज्यातील सत्ताधारी पक्ष 'सपा' सुध्