Posts

Showing posts from April, 2021

ऋग्वेद.....

Image
ऋग्वेद..... तुझ्या जाण्याच्या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही रे मित्रा... भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द वापरताना हात थरथरताय, आणि अश्रू तर सकाळ पासून ओघळताय... 😭😭 हे तुझं वय होतं का...?  ऋग्या अरे...!! मला आपली पहिली भेट आठवली,  मुंबईत एका टेबलवर बसून नाश्ता करत असताना तुझी झालेली ओळख. "मी, ऋग्वेद कुलकर्णी, धाराशिव जिल्ह्यातील कळंबचा" तुझ्या त्या नेहमीच्या टोनमध्ये बोलला होतास... तुझी प्रचंड आकलन क्षमता, बुद्धी चातुर्य, शब्दांवर असलेली पकड, बोलण्यातला गंभीरपणा... सगळं सगळं आठवतंय रे मला!  मुंबईत भेटलेला सर्वात जवळचा मित्र होतास तू. रात्र रात्रभर तुझ्या सोबत राजकारण विषयाच्या गप्पा ... आपल्या दोघांचा समान आवडीचा विषय तो, तात्विक विश्लेषण, प्रत्येक गोष्टीचा सखोल अँगल सगळंच असायचं तुझाकडे. वाळकेश्र्वर ते चर्चगेट  जवळपास ४.५ किमीचा रस्ता आपल्याला गप्पा मारता याव्या म्हणून आपण कितीतरी वेळा पायी सर केलेला!!  आपलं शेवटचं संभाषण पण अलौकिक होतं, त्यात श्रीकृष्णाने महाभारतात भीष्म, द्रोणाचार्य, आणि कर्णाच्या अंतिम क्षणांत केलेल्या संभाषणावर चर्चा रंगली होती आपली.  पण हे श