Posts

Showing posts with the label World Poetry day

सूर्य कधी मावळत नसतो....

Image
सूर्य कधी मावळत नसतो, मावळतो तो क्षण मावळतात छटा काहीश्या, नसते मावळत प्राक्तन सूर्याचे मावळणे, म्हणजे त्याचा अस्त नव्हे क्षणभराची गाथा ही ,  जग नेहमीच अंधारग्रस्त नव्हे सूर्याच्या जाण्याने असतील उंचावत काही शक्ती आत्मविश्वासाची ही कसोटी बाळगू नका धास्ती अंधाराचा होईल अस्त, मिटेल थैमानाचा गुन्हा तेवत ठेवा विचार हा, की सूर्य उद्या उगवेल पुन्हा.... - हर्षल कंसारा