Posts

Showing posts from 2014

सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा….

Image
       कधी कधी थोडे इतिहासात डोकावून पाहिले की काही गोष्टी अधिक स्पष्ट होतात. भारतावर मोहम्मद घोरी नावाच्या आक्रमकाने इ. स. 1100-1200 च्या काळात आक्रमण केले होते, राजा पृथ्वीराज चौहान त्यावेळी भारताचा सम्राट  होता. घोरीने पहिली स्वारी केली अनेक सैनीक, प्रचंड शस्त्रबळा सहीत, परंतू राजा पृथ्वीराज चौहनही काही कमी शूर नव्हता, त्याने घोरीच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पराभव केला व मोहम्मद घोरीला तलवारीच्या धारेवर धरले. आणि अचानक त्याच क्षणी घोरीला त्याच्या चूकांचा पश्चाताप झाला, त्याने त्वरीत राजा पृथ्वीराज चौहानची माफी मागून घेतली, आणि आमच्या राजाने युद्धधर्माचे पालन करित त्यास सहानुभूती दर्शवीत जिवंत सोडून दिले. परंतू पुन्हा आक्रमण नाही करणार तो मोहम्मद घोरी कसला. त्याने पुन्हा सैन्य, शस्त्र जमवीले, पुन्हा आक्रमण केले. राजा पृथ्वीराजने त्यास पुन्हा पराभूत केले आणि परभूत  होताच क्षणी घोरीस पुन्हा चुक केल्याचा पश्चाताप झाला, त्याने पुन्हा माफी मागितली आणि आमच्या राजानेही त्यास पुन्हा माफ करुन जिवंत सोडून दिले. असे एक वेळेला नाही, दोन वेळेला नाही तर तब्बल सोळा वेळी घडले. प्रत्येक पराभव

जनता माफ नही करेगी…

Image
    'सर्व धर्म समभाव' आणि 'व्यक्ती स्वातंत्र्य' ही भारतीय संविधानाची दोन मुलभूत पैलू आहेत. यावर आक्षेप घेणारा नेहमी गुन्हेगारच ठरतो. मग तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा, पक्षाचा असो, सत्ताधारी असो वा विरोधीपक्षाचा असो… संविधानाविरोधी आवाज म्हणजेच देशविरोधी आवाज, असच आमच्या देशात आजतागायत मानले गेले आहे. सध्या संसदेत असेच एक वादळ उठले आहे, वादळ आहे धर्मांतरणाचे… हे वादळ संसदेत कदाचीत उठलेही नसते, जर धर्मांतरण करणारा गट हिंदू असता, परंतू धर्मांतरण हे मुस्लिम कुटुंबीयांचे झाले आहे, त्यामुळे "आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत", असे मुस्लिम गटाला दाखविण्याची केविलवाणी धडपड सेक्युलर मन्डळींची सुरु आहे. आणि यात मिडिया सुद्दा मागे नाही, जणू देशात पहिल्यांदाच लोकं एका धर्मातून दुसर्या धर्मात गेले कि काय असे वातावरण मिडियाने तयार केले आहे.     देशात घडलेल्या कुठल्याही घटनेला सरकारच जबाबदार असते का…? ज्याअर्थी विरोधीपक्षांनी हा मुद्दा संसदेत उचलला आहे त्याअर्थी असेच वाटते, आणि जर का हे खरे असेल तर ही घटना ज्या राज्यात घडली त्या राज्यातील सत्ताधारी पक्ष 'सपा' सुध्

शंभर कोटी ह्रदये हिंदू, हजार कोटी स्वप्ने हिंदू

माझे अवघे मी पण हिंदू आयुष्याचा कणकण हिंदू, ह्रदयामधले स्पंदन हिंदू तन-मन हिंदू, जीवन हिंदू ! दरीदरीतिल वारे हिंदू आकाशातिल तारे हिंदू, इथली जमीन, माती हिंदू सागर, सरिता गाती हिंदू ! धगधगणारी मशाल हिंदू आकाशाहुन विशाल हिंदू, सागरापरी अफाट हिंदू हिमालयाहुन विराट हिंदू ! तलवारीचे पाते हिंदू माणुसकीचे नाते हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू मानवतेचा विचार हिंदू ! महिला, बालक, जवान हिंदू खेड्यामधला किसान हिंदू, शहरांमधुनी फिरतो हिंदू नसानसांतुन झरतो हिंदू ! प्रत्येकाची भाषा हिंदू जात, धर्म अभिलाषा हिंदू तुकाराम अन कबीर हिंदू हरेक मस्जिद, मंदिर हिंदू ! इथला हरेक मानव हिंदू अवघी जनता अभिनव हिंदू, झंझावाती वादळ हिंदू हिंदू हिंदू केवळ हिंदू ! शंभर कोटी ह्रदये हिंदू, हजार कोटी स्वप्ने हिंदू, असंख्य, अगणित ज्वलंत हिंदू अखंड भारत, अनंत हिंदू !!! ----स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ...

"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....

जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'. ३ दिवसानंतर 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे'

आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो

आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो ॥ पहिला प्रश्न होता माझा… अरुणाच्या सारथ्याने तू तर रोज येतो जीवनदायी किरणांनी तुझ्या, ही सृष्टी बहरवितो timing सगळी जुळविण्यासाठी तू कुठले रे App वापरतो…? प्रश्नावरती माझ्या सुर्य खुद्कन हसला आणि उत्तराच्या स्वरात उद् गारला… App वापरण्याची  असेल तुम्हास सक्ती मनात माझ्या केवळ सेवा सृष्टीची मनाची शक्ती असते अनोखी सारेच timing सहज जुळविती…॥ दुसरा प्रश्न मनात आला… प्रातःकाळाचे रुप तुझे किती रे मनमोहक असते निर्मल कोमल किरणांकडे अगदि पहावेसे वाटते पण वेळेसोबत ताप तुझा वाढत रहातो सायंकाळी पुन्हा रुप तुझे ते शांत होते हे Temperature maintenance तुला कसे रे जमते? उत्तर द्यायला सुर्य म्हणाला… वेळेनुसार वागता आलं पाहिजे योग्य वेळेला योग्य तापता आलं पाहिजे Temperature maintenance काय मोठी गोष्ट आहे…!! जगाच्या कल्याणासाठी निरंतर राबता आलं पाहिजे…॥ मग मी तिसर्या प्रश्नाकडे वळलो… तुझ्या उदयाने  ही सृष्टी जागते अनेकांची क्षुधा भागते तू चैतन्याची मूर्ती असूनही तूला कधी कधी ग्रहण का लागते? गंभीर स्वरात सुर्य उत्तरला… ग्रहणकाल म्हणजे अग्निपरिक्षा त्यात होते