Posts

Showing posts from 2018

विचारांना काय लागते?

Image
विचारांना काय लागते? थोडी पार्श्वभूमी, थोडासा ध्यास थोडे स्वप्न, थोडा अभ्यास थोडी लागते आशा, थोडी निराशा ही थोडी पाहिजे आभा, थोडी अभिलाषा ही थोडे क्षण लागतात आनंदाचे, अभिमानाचे, उत्साहाचे  थोडे प्रसंग हवे दुःखाचे, अपयशाचे, निरुत्साहाचे थोडे असावे सहमतीचे, थोडे असहमतीचे ही थोडी हवी गती, ज्याने विचार नवा आकार घेई थोडे बाळगावे मुद्दे, थोडे प्रसंग थोडी असावी जिद्द, थोडा व्यासंग थोड्या थोड्या गोष्टींतून, विचाराचा जन्म होतो थोडे पडत थोडे धडपडत, तोही परिपक्व होतो - हर्षल कंसारा

आठवणीतले वडाळकर बाबा ….

Image
आज अनेक दिवसांनी काहीतरी लिहायची इच्छा होत आहे. विषय देखील तसाच आहे. वडाळकर सर गेल्याची बातमी ऐकली, मनाला जणू चटका बसल्यासारखे वाटले. काही व्यक्ती अश्या असतात कि ज्यांच्या केवळ असण्याने सुद्धा प्रेरणा मिळत असते, प्रत्येक वेळी संवादाची आवश्यकता असतेच असे नाही. माझ्यासाठी असेच एक व्यक्तिमत्व वडाळकर सरांच्या रूपाने होते. दरवेळी आमचा संवाद होत असे, असे नव्हते, मात्र त्यांना सहज भेटून देखील मला प्रेरणादायी वाटत असे. त्यांना आम्ही बाबा म्हणून संबोधत होतो. (खान्देशात बाबा शब्द आजोबा या भावार्थाने वापरला जातो. ) असे आमचे वडाळकर बाबा गेल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाले. दोन दिवसांपासून मन बैचेन होऊन त्यांच्याबद्दल सतत विचार करत आहे, आणि त्या विचारांना कुठेतरी व्यक्त करायला वाट व्हावी म्हणून लिहायला घेतले. वडाळकर बाबांशी माझी ओळख तशी संघाच्या शाखेत झाली. ५ वी - ६ वीत असताना त्यांच्या बालाजी वाड्यात आमची संघाची शाखा भरत असे. लहानपणी खेळाचे, गोष्टींचे ऐकण्याचे आकर्षण असल्यामुळे स्वाभाविक शाखेची ओढ लागली, आणि हळू - हळू मी संघमय कधी झालो कळलेच नाही. त्यात प्रारंभीच्या काळात महत्वाची भूमिका

आरोप नवे, पण तथ्य....?

आपल्या देशात स्वतःचे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी संघ आणि हिंदुत्वाला दुय्यम, तुच्छ, किंवा धूर्त लेखणे खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पुरोगामीत्वाच्या दुकानदारीचे लायसन्स मिळू शकत नाही. विशेषतः पत्रकारितेच्या या क्षेत्रात 'तटस्थ', किंवा 'जर्नालिझम विथ करेज' वैगरे बिरुद मिरवण्यासाठी या युक्त्या खुप्पच फायदेशीर ठरतात. तसेच या पंगतीत मानाचे स्थान पटकावण्यासाठी अनेकांची धडपड सतत सुरू असते. त्यामुळे सतत संघ आणि हिंदुत्वाला दोषींच्या पिंजऱ्यात उभे करणे महत्वाचे होऊन जाते. The most you intolerant with RSS and Hindutva, the best secular you are. अशी यांच्या मनाची भाबडी समजूत ! त्यामुळे एक विशिष्ट चौकटीतच ही मंडळी संघाला बघत असतात, अथवा बघू शकतात. आणि म्हणूनच काही विशिष्ट प्रश्नांवरच ही मंडळी खेळत असतात. उदा. आधी संघाला मुस्लिम विरोधी, ख्रिश्चन विरोधक म्हणून बडवत फिरायचे, संघविचारधारेवर असहिष्णुतेचे लेबल चिकटवायचे, आणि मात्र जेव्हा संघ संपूर्ण समाजासोबत (वैचारिक विरोधकांसह) संवाद साधण्याची नांदी करत असताना मात्र 'हे सगळे आत्ताच का?', 'खूप आधी का नाही?', 

....तो लिबरल हो तुम

Image
दिलों में अपने तुम मोदी को गालिया देते जी रहे हो , तो लिबरल हो तुम नजर में आरएसएस को आतंकिया समझते जी रहे हो , तो लिबरल हो तुम जेएनयु के बच्चों की तरह आझादी मांगना सीखो तुम एक सेक्युलर के जैसे अल्पसंख्यकों का तुष्टिकरण करना सीखो हर एक रोहिंग्या से मिलो खोले अपनी बाहे हर एक समा पंडितों को जो कश्मीर से निकालना चाहे जो अटल को श्रद्धांजलि देते हुए भी मोदी को गालिया दे रहे हो , तो लिबरल हो तुम   -         हर्षल कंसारा # Kansarastra

जर असते इंटरनेट महाभारत काळात....

Image
जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर नसते गेले श्रीकृष्ण द्रौपदीच्या चीरहरणात, तिच्या बचावला.. त्यांनी देखील केला असता डी.पी. आपला ब्लॅक नसता घडला द्यूताचा तो खेळ... ऑनलाईन मिटिंगनेच कदाचित साधला असता मेळ दु:शासनाने देखील डायरेक्ट वस्त्र हरणाऐवजी तिला केले असते ट्रोल... #द्रौपदी हॅशटॅगचे, त्यासभेत निराळेच असते मोल धृतराष्ट्राने कदाचित ट्विट करूनच केली असती घटनेची ‘कडी निंदा’ आणि केवळ बोर्ड घेऊनच उभी राहिलेली गांधारी म्हटली असती "मैं शर्मिंदा... मैं शर्मिंदा... " जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर खरोखर झाले असते का हो युद्ध...? की व्हर्च्युअल जगात कौरव पांडवांची सायबर सेल झाली असती कटिबद्ध? ब्रम्हास्त्र देखील ठरले असते हॅकींग पुढे फोल... कुरुक्षेत्रातील फेसबुकने अनेकांचा डेटा, विकला असता कवडीमोल आणि केंब्रीज अॅनालिटीकाने त्यामध्ये नक्कीच केला असता झोल... तुटलेल्या चाकाचा रथ कर्णाने olxवर दिला असता विकून... आणि अभिमन्यूने देखिल चक्रव्यूह यूट्यूबवरुन घेतले असते ना शिकून... जर असते इंटरनेट

सूर्य कधी मावळत नसतो....

Image
सूर्य कधी मावळत नसतो, मावळतो तो क्षण मावळतात छटा काहीश्या, नसते मावळत प्राक्तन सूर्याचे मावळणे, म्हणजे त्याचा अस्त नव्हे क्षणभराची गाथा ही ,  जग नेहमीच अंधारग्रस्त नव्हे सूर्याच्या जाण्याने असतील उंचावत काही शक्ती आत्मविश्वासाची ही कसोटी बाळगू नका धास्ती अंधाराचा होईल अस्त, मिटेल थैमानाचा गुन्हा तेवत ठेवा विचार हा, की सूर्य उद्या उगवेल पुन्हा.... - हर्षल कंसारा

थंडीत पडलेले उबदार प्रश्नं

Image
देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  आपल्या फसलेल्या राजकारणामुळे सत्तेपासून लांब गेलेल्या या राजकारण्यांना थंडीच्या दिवसात जी उबदार स्वप्ने पडू लागली आहेत, ती सहजासहजी साकारली जातील, याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर काल बहुचर्चित अशी मुलाखत रंगली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  महत्वाच्या प्रश्नांना बगल महाराष्ट्राला पडलेले प्रश्न या मुलाखतीत विचारणार असे राज ठाकरे यांनी सुरुवातील जाहीर केले. मात्र मुलाखतीतील अधिक भाग हा ठाकरे कुटुंबीय, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी आणि दस्तूर