Posts

Showing posts from February, 2015

सोशल नेटवर्क साईटवर वाचलेली एक गोष्ट

Image
एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले. हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?" "साहेब" भिकारी म्हणतो, "माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा." तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो. त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन हो

सूर्याचे आमंत्रण

Image
सूर्य आला आमंत्रणाला, म्हटला "ये रे बाबा माझ्या गावाला" आधी तर उठण्याचाच कंटाळा, मग ऐकण्याचा घोटाळा. सुरुवातीस वाटले सूर्य कशाला बोलवेल त्याच्या गावाला? म्हणून पुढले दोन दिवस मी सूर्यालाच टाळला, पण आमंत्रण देण्यास तो अजिबात नाही कंटाळला. रोज रोजचे त्याचे आमंत्रण पाहून एके दिवशी विचारूनच टाकले,"असे काय आहे रे तुझ्या गावाला?"   तिथे आहे का पुण्यासारखी हिरवळ आणि कोल्हापूरची मिसळ? पैठण मधली साडी आणि BMW ची गाडी? 3G/4G चा लागतो का Call ? आणि Shopping करायला भेटतील का Mall? whats app, Facebook चं आहे का रे Access? आणि Career बनवताना मिळेल का Success? बरं ते सगळं राहू दे, तू सांग (दबलेल्या आवाजात) Weekend ला पार्टी आणि Holidays ला सुट्टी मिळते का रे तुझ्या गावाला?   माझी प्रश्नांची यादी संपल्या-संपल्या सूर्य म्हणाला, "जिथे भौतिकतेचा प्रभाव असतो, तिथे माणूसकिचा आभाव असतो" "म्हणजे…?", मी विचारले.   सूर्य: तुमच्याकडे हिरवळ आणि मिसळचीच झगमग आहे, पण माझ्या गावात या पलिकडचे जग आहे. गाडी आणि साडी एवढ्यावरच आम्ही अटकत नाही, म