Posts

Showing posts from March, 2017

गुळगुळीत गोट्यांकडून सणसणीत

Image
-   हर्षल कंसारा    कालचा लोकसत्ताचा संघ आयोजित ज्ञानसंगमावरील अग्रलेख वाचला. सुरुवातीला थोडा विचार केला की, खरच संघातून एकही संशोधक, विचारवंत कसा तयार झाला नाही? ९० वर्षे लोक संघटीत करून कार्यकर्त्यांना केवळ नंदीबैलासारखे संघ वागवत होता का? असा प्रश्न मनात आला. पण अचानक लक्षात आले की, गेल्या ९० वर्षात एखादे ऑलम्पिक मेडल आणेल असा खेळाडू देखील संघाने तयार केला नाही. दररोज शाखेत २५ मिनिटे खेळ घेऊन देखील! मग पुन्हा लक्षात आले की, एखादा मोठा शिक्षण महर्षी म्हणता येईल असा शिक्षणसम्राट देखील तयार केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघाचा स्वयंसेवक म्हणवता येईल, असे एकही शंकराचार्य नाहीत. अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, देशातील एखादा नामवंत उद्योजक संघ घडवू शकला नाही. खरच संघात घडले ते केवळ नर्मदेचे गोटे..! परंतु लोकसत्तेचे एकांगी समीक्षण वाचून मत बनवले तर मी देखील तथाकथित संघाद्वेशी पुरोगामी गोटा ठरेल. संघाची स्थापना झाली तेव्हाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कदाचित या प्रश्नांचे उत्तर मिळू शकते (अर्थात तेवढ्या प्रामाणिकतेने या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर) भारताच्या स्वातंत