Posts

Showing posts from October, 2016

तेवढेच शुद्ध तेवढेच सात्विक - भाग १

गेल्या वर्षी विजयादशमीला नागपूर जाण्याचा योग आला. मा. मनमोहनजींना(मनमोहनजी वैद्य, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख) भेटण्यासाठी वेळ मागितला होता तेव्हा, "नागपूरला ये , तेथे निवांत भेटता येईल." असे मनमोहनजी म्हटल्यामुळे नागपूर जाणे पक्के झाले. विजयादशमीला नागपूर जाणे म्हणजेच रेशीमबागेतला उत्सव पहायला मिळणार, आणि  रेशीमबागेतला विजयादशमी  उत्सव बघण्याचा योग काय असतो, ते संघ स्वयंसेवक असल्याशिवाय कळणे महाकठीण ...! तरी देखील थोडे समजविण्याचा प्रयत्न करतो. संघाची सुरुवात  नागपूर पासून झालीये, त्यामुळे तेथील संघकाम, प्रत्यक्ष पूजनीय डॉ. हेडगेवारांसोबत काम केलेले अनेक कार्यकर्ते असणारे नगर म्हणजेच नागपूर, थोडक्यात 'संघाची पंढरीच'. अश्या ठिकाणाचा संघ स्थापना दिनाचा उत्सव बघणे म्हणजेच, मन आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तिरी न्हाऊन निघण्यासारखेच असते स्वयंसेवकांसाठी. त्यामुळेच नागपूर जाण्याची मनात Excitement होतीच.    तेथे मनमोहनजी शिवाय माझी कुणाशीच ओळख नाही, ही बाब स्वतः मनमोहनजी जाणून असल्यामुळे, माझी सकाळी थांबण्याची व्यवस्था, स्टेशन जवळ घर असलेल्या एका कार्यकर्त्यां