सूर्य आला आमंत्रणाला, म्हटला "ये रे बाबा माझ्या गावाला" आधी तर उठण्याचाच कंटाळा, मग ऐकण्याचा घोटाळा. सुरुवातीस वाटले सूर्य कशाला बोलवेल त्याच्या गावाला? म्हणून पुढले दोन दिवस मी सूर्यालाच टाळला, पण आमंत्रण देण्यास तो अजिबात नाही कंटाळला. रोज रोजचे त्याचे आमंत्रण पाहून एके दिवशी विचारूनच टाकले,"असे काय आहे रे तुझ्या गावाला?" तिथे आहे का पुण्यासारखी हिरवळ आणि कोल्हापूरची मिसळ? पैठण मधली साडी आणि BMW ची गाडी? 3G/4G चा लागतो का Call ? आणि Shopping करायला भेटतील का Mall? whats app, Facebook चं आहे का रे Access? आणि Career बनवताना मिळेल का Success? बरं ते सगळं राहू दे, तू सांग (दबलेल्या आवाजात) Weekend ला पार्टी आणि Holidays ला सुट्टी मिळते का रे तुझ्या गावाला? माझी प्रश्नांची यादी संपल्या-संपल्या सूर्य म्हणाला, "जिथे भौतिकतेचा प्रभाव असतो, तिथे माणूसकिचा आभाव असतो" "म्हणजे…?", मी विचारले. सूर्य: तुमच्याकडे हिरवळ आणि मिसळचीच झगमग आहे, पण माझ्या गावात या पलिकडचे जग आहे. गाडी आणि साडी एवढ्यावरच आम्ही अटकत नाही, म...