Posts

Showing posts from December, 2019

शस्त्र विक्रेता, शिकारी आणि जंगल

Image
गंधक आणि अंदक या दोन देशांच्या सीमेवर घनदाट जंगल होते. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात अनेक पशु-पक्षी आनंदाने बागडत असत. जंगलातील मुबलक पाण्यामुळे पशु-पक्ष्यांना अनुकूल आणि पोषक वातावरण असे. पक्ष्यांना दाणा-पाणी, पशूंना भरपूर आहार या सगळ्यामुळे हे जंगल आनंदाने बहरले होते.  परंतु, अचानक एके दिवशी दोन्ही देशांमध्ये जंगलावरून वाद निर्माण झाला आणि सरते शेवटी उपाय म्हणून जंगल अर्धे-अर्धे वाटून घेण्याचा तह झाला. तसेच या जंगलातील जैवविविधतेच्या संरक्षणाचा देखील करार झाला. या करारानुसार दोन्ही देश आपापल्या हद्दीतील प्राण्यांचे रक्षण आणि संवर्धन करतील असे ठरले.  कराराला २० वर्षे लोटली. त्यानुसार गंधक देशातील जैवविविधतेत जवळपास पन्नास टक्के वाढ झाली, तसेच तेथील प्राण्याच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. मात्र अंदक देशाने कराराचे प्रामाणिक पालन केले नाही. तिथे शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला. विविध शिकाऱ्यांनी मिळून त्या जंगलातील प्राण्यांची एक-एक प्रजाती समूळ नष्ट केली. अनेकांनी झाडं कापून वस्त्या निर्माण केल्या. परिणामी, तेथील प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. शिकारी आणि इतरा

सकलेश्वराचे मंदिर

Image
आज एका खाजगी कामानिमित्त अंबाजोगाई येथे येणे झाले, योगेश्र्वरी देवीचे तीर्थक्षेत्र असलेले अंबाजोगाई गाव तसे खूप प्राचीन आहे, म्हणजे ८ व्या शतकातील चालुक्य साम्राज्यात देखील या नगरीचा उल्लेख आढळतो. गावात हिंडत असताना येथे साधारणतः दीड वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात काही मूर्ती सापडल्याचा संदर्भ आला, मग काय, त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. माननीय शरदराव हेबाळकर यांनी त्याबद्दल माहिती सांगितली आणि सायंकाळी त्याठिकाणी भेट द्यायला गेलो. सकलेश्वर महादेवाचे जीर्ण स्वरूपातील हेमाडपंथी मंदिर अंबाजोगाई शहराच्या २ किलोमीटर अंतरावर आहे. साधारणतः बाराव्या शतकातील हे मंदिर यादवांचा राजा जैत्रपाल याची राजधानी अंबाजोगाई असताना, त्या काळात उभारले गेले आहे. मंदिराला भेट दिल्यावर लक्षात येते की, येथे त्याकाळी ४-५ मंदिरांची उभारणी केली असावी, आज तेथे एकच मंदिर त्यांपैकी शिल्लक आहे, बाकी सर्वांचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले आहेत. दीड वर्षांपूर्वी एका शेतात काही बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू केले असता स्थानिकांना काही मुर्त्या आढळून आल्या, त्यामुळे इतर ठिकाणीही उत्खनन सुरू केले तर