Posts

Showing posts from December, 2018

विचारांना काय लागते?

Image
विचारांना काय लागते? थोडी पार्श्वभूमी, थोडासा ध्यास थोडे स्वप्न, थोडा अभ्यास थोडी लागते आशा, थोडी निराशा ही थोडी पाहिजे आभा, थोडी अभिलाषा ही थोडे क्षण लागतात आनंदाचे, अभिमानाचे, उत्साहाचे  थोडे प्रसंग हवे दुःखाचे, अपयशाचे, निरुत्साहाचे थोडे असावे सहमतीचे, थोडे असहमतीचे ही थोडी हवी गती, ज्याने विचार नवा आकार घेई थोडे बाळगावे मुद्दे, थोडे प्रसंग थोडी असावी जिद्द, थोडा व्यासंग थोड्या थोड्या गोष्टींतून, विचाराचा जन्म होतो थोडे पडत थोडे धडपडत, तोही परिपक्व होतो - हर्षल कंसारा

आठवणीतले वडाळकर बाबा ….

Image
आज अनेक दिवसांनी काहीतरी लिहायची इच्छा होत आहे. विषय देखील तसाच आहे. वडाळकर सर गेल्याची बातमी ऐकली, मनाला जणू चटका बसल्यासारखे वाटले. काही व्यक्ती अश्या असतात कि ज्यांच्या केवळ असण्याने सुद्धा प्रेरणा मिळत असते, प्रत्येक वेळी संवादाची आवश्यकता असतेच असे नाही. माझ्यासाठी असेच एक व्यक्तिमत्व वडाळकर सरांच्या रूपाने होते. दरवेळी आमचा संवाद होत असे, असे नव्हते, मात्र त्यांना सहज भेटून देखील मला प्रेरणादायी वाटत असे. त्यांना आम्ही बाबा म्हणून संबोधत होतो. (खान्देशात बाबा शब्द आजोबा या भावार्थाने वापरला जातो. ) असे आमचे वडाळकर बाबा गेल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाले. दोन दिवसांपासून मन बैचेन होऊन त्यांच्याबद्दल सतत विचार करत आहे, आणि त्या विचारांना कुठेतरी व्यक्त करायला वाट व्हावी म्हणून लिहायला घेतले. वडाळकर बाबांशी माझी ओळख तशी संघाच्या शाखेत झाली. ५ वी - ६ वीत असताना त्यांच्या बालाजी वाड्यात आमची संघाची शाखा भरत असे. लहानपणी खेळाचे, गोष्टींचे ऐकण्याचे आकर्षण असल्यामुळे स्वाभाविक शाखेची ओढ लागली, आणि हळू - हळू मी संघमय कधी झालो कळलेच नाही. त्यात प्रारंभीच्या काळात महत्वाची भूमिका