Posts

Showing posts from November, 2019

तुम्हावर केली मी मर्जी बहाल

Image
तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ शरद पवार सत्तेची तोरणं बांधून मातोश्रीवरती ही डरकाळी बेगडी, उधळीते काळजातली भीती जवळी यावं मला पुसावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम खुशाल गुरगुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटल सत्तेचं कोडं विरह जाळीता मला लाचारी पत्कारली मी खुशाल मॅडम मॅडम अदबीनं तुम्ही विनवता सोनियाबाई स्वाभिमानाचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच न घालवावी रात साजणा, कधीतरी व्हावी सत्तेची सकाळ #Kansarastra

संजूबाबा...

Image
तुझे अग्रलेख अजिबात वाचलेले नाहीत नाही म्हणायला थोडेफार मीडियात ऐकले आहे तुझ्याबद्दल तुझ्यावर कविता लिहितोय म्हणून मला हसू नको तुझ्या हसण्याचे दिवस लवकरच संपतील... एक अँकर तावातावात तुझे स्टेटमेंट वाचत होती स्टुडिओमध्ये तुझ्या फोटो मागे काही पत्रकार नाचत होते मीडियाच्या टीआरपीनुसार तू भले हिरो असशील पण महाराष्ट्राच्या जनादेशाला तू तुडवतोय त्याचं काय....? हिंदी शायरी लिहून तू रोज टिव-टिव करतोस मित्र पक्षावर शत्रूपेक्षा अधिक प्रखर प्रहार करतोस सोशल मीडियावर भले तू अधिक चर्चेत असशील पण मराठी बाणाचा गाशा गुंडाळून टाकलास त्याचं काय...? संजूबाबा, युती तोडणं तितकं कठीण नाही नाही कठीण मुख्यमंत्रीपदासाठी तगादा लावणं इथं हिंदुत्वाच्या विरोधकांशी लढता-लढता स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्य खपवलं होतं त्याचं काय...? अनेकांनी आपल्या जिवाचं रान केलं होतं त्याचं काय...? #Kansarastra