Posts

Showing posts from April, 2017

प्रश्न केवळ मंदिराचा नाही, खरा प्रश्न आमच्या आदर्शांचा

Image
अनेक वेळेला राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा ऐकली आहे. "मंदिर तेथेच बनले पाहिजे", पासून तर, "छे छे मंदिराने कुणाच्या ताटात भाकरी येणार का? मग कशाला त्याच्या भानगडीत पडायचे," इथपर्यंतचे सर्व तत्वज्ञान ऐकायला मिळते. परंतु मूळ प्रश्न शिल्लक राहून जातो तो म्हणजे, आपल्या आदर्शांचा.... मंदिराचा आणि आदर्शांचा काय संबंध? असा देखील प्रश्न कुणाला पडू शकेल. परंतु असा प्रश्न निर्माण होणे म्हणजेच या देशाच्या मूळ आदर्शापासून थोडे अंतर बाळगण्यासारखे आहे. म्हणजे, मी जेव्हा जेव्हा शिवरायांचा पुतळा पाहतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या गड-किल्ल्यांवर गेल्यानंतर मनात हिंदवी स्वराज्यासारखे देशासाठी कालानुरूप काहीतरी करण्याचा विचार स्पर्श करून जातो. मी शिवरायांचे चरित्र पुस्तकात वाचले आहे, त्यांच्या सगळ्या कथा मला तोंडपाठ आहेत, त्यांच्यावर आधारित मालिका, नाटक, डॉक्युमेंट्री सगळ्या मी पहिल्या आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड इत्यादी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकी ज्ञानापेक्षा एक वे