Posts

Showing posts from October, 2014

शंभर कोटी ह्रदये हिंदू, हजार कोटी स्वप्ने हिंदू

माझे अवघे मी पण हिंदू आयुष्याचा कणकण हिंदू, ह्रदयामधले स्पंदन हिंदू तन-मन हिंदू, जीवन हिंदू ! दरीदरीतिल वारे हिंदू आकाशातिल तारे हिंदू, इथली जमीन, माती हिंदू सागर, सरिता गाती हिंदू ! धगधगणारी मशाल हिंदू आकाशाहुन विशाल हिंदू, सागरापरी अफाट हिंदू हिमालयाहुन विराट हिंदू ! तलवारीचे पाते हिंदू माणुसकीचे नाते हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू मानवतेचा विचार हिंदू ! महिला, बालक, जवान हिंदू खेड्यामधला किसान हिंदू, शहरांमधुनी फिरतो हिंदू नसानसांतुन झरतो हिंदू ! प्रत्येकाची भाषा हिंदू जात, धर्म अभिलाषा हिंदू तुकाराम अन कबीर हिंदू हरेक मस्जिद, मंदिर हिंदू ! इथला हरेक मानव हिंदू अवघी जनता अभिनव हिंदू, झंझावाती वादळ हिंदू हिंदू हिंदू केवळ हिंदू ! शंभर कोटी ह्रदये हिंदू, हजार कोटी स्वप्ने हिंदू, असंख्य, अगणित ज्वलंत हिंदू अखंड भारत, अनंत हिंदू !!! ----स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ...

"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....

जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'. ३ दिवसानंतर 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे'