Posts

Showing posts from November, 2015

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

Image
आज तसा निवांत वेळ होता, रविवार असल्यामुळे आँफिसला सुट्टी, त्यामुळे लवकर उठणं, तयार होऊन गाडी पकडणं अशी कसलीही गडबड नव्हती. म्हणूनच वाटलं थोड्या बातम्या बघाव्यात. जगात कुठला प्रश्न हँश टँग(#) वर आहे हे जाणण्याचे उत्तम साधन आहे मिडिया. म्हणूनच टि. व्ही. वर बातम्या सुरु केल्यात सुरुवातीस दुरदर्शनचे डि. डि. न्यूज लागले, त्यातील बातम्या बघुन लक्षात आले कि देशात प्रचंड प्रगती होतेय, युवाशक्तीच्या माध्यामातुन देशाला विकास तसेच प्रगतीपथावर नेणे शक्य आहे, नवीन सरकारची कामं पण जोरात सुरु आहेत. कुठे दुर्गम भागात पक्का रस्ता निर्माण करणे सुरु आहे, तर कुठे देशाचा GDP जोरात वाढत चाललाय. भारत जगातील अनेक नवनवीन देशांशी आपले संबंध दृढ करुन जागतिक पातळीवर आपले एक अनोखे स्थान निर्माण करतोय. जागतिक व्यापाराच्या अनेकानेक   संधी भारतात दाखल होताना दिसताय, तर कधी नवत भारतातील श्रीमंत लोकं Give_It_Up च्या माध्यमातून स्वत:हून गरिबांसाठी आपली गँस सबसिडी   सोडताय.   हे सगळं डि. डि. न्यूज वर पाहून मनाला प्रचंड समाधान लाभले. आपला देश नक्कीच प्रगती पथावर मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास निर्माण झालाच होता