Posts

Showing posts from 2017

अमृताताई तुमच्या 'जाण'कारीसाठी

Image
प्रसंग १ : अनिता बिज्या वसावे रा . चिवलउतार ता . अक्कलकुवा , जि . नंदुरबार आपले डी . एड . संपवून नोकरीच्या शोधात होती . तिची नेमकी गरज ओळखू एका ख्रिश्चन प्रचारीकेने तिला एस . ए . मिशन या शाळेत नोकरी दिली . आई - वडील तिच्या नोकरीने सुखावले गेले असता अचानक काही दिवसांनी २८ नोव्हेंबर २०१६ ला तिचा , भावाला पाँडिचेरीहून फोन आला व तेथून परत येण्याकरिता भावाला ३००० रुप याची तिने मागणी केली . भावाने तिच्या म्हणण्यानुसार पैसे पाठविले व १७ डिसेंबर २०१६ ला परत येणार असल्याचे तिने कळविले देखील, मात्र अनिता घरी परतली नाही . अचानक ९ डिसेंबर २०१६ ला आरशी तडवी नावाचा इसम अनिताच्या घरी जाऊन आई - वडिलांना पाँडिचेरी येथे घेऊन गेला . तेथे जाऊन लक्षात की अनिताचा मृत्यू झाला आहे . पालकांनी मृत्यूची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली . तसेच तिच्या प्रेताला देखील हात लावू दिला नाही , आणि प्रेताचे अंतिमसंस्कार वनवासी परंपरेनुसार न करू देता जबरदस्तीने ख्रिश्चन पद्धतीने करण्यास भाग पाडले . हताश पालक पाँडिचेरी येथे कुठलीही कायदेशीर कारवाई करू शकले

प्रश्न केवळ मंदिराचा नाही, खरा प्रश्न आमच्या आदर्शांचा

Image
अनेक वेळेला राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा ऐकली आहे. "मंदिर तेथेच बनले पाहिजे", पासून तर, "छे छे मंदिराने कुणाच्या ताटात भाकरी येणार का? मग कशाला त्याच्या भानगडीत पडायचे," इथपर्यंतचे सर्व तत्वज्ञान ऐकायला मिळते. परंतु मूळ प्रश्न शिल्लक राहून जातो तो म्हणजे, आपल्या आदर्शांचा.... मंदिराचा आणि आदर्शांचा काय संबंध? असा देखील प्रश्न कुणाला पडू शकेल. परंतु असा प्रश्न निर्माण होणे म्हणजेच या देशाच्या मूळ आदर्शापासून थोडे अंतर बाळगण्यासारखे आहे. म्हणजे, मी जेव्हा जेव्हा शिवरायांचा पुतळा पाहतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या गड-किल्ल्यांवर गेल्यानंतर मनात हिंदवी स्वराज्यासारखे देशासाठी कालानुरूप काहीतरी करण्याचा विचार स्पर्श करून जातो. मी शिवरायांचे चरित्र पुस्तकात वाचले आहे, त्यांच्या सगळ्या कथा मला तोंडपाठ आहेत, त्यांच्यावर आधारित मालिका, नाटक, डॉक्युमेंट्री सगळ्या मी पहिल्या आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड इत्यादी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकी ज्ञानापेक्षा एक वे

गुळगुळीत गोट्यांकडून सणसणीत

Image
-   हर्षल कंसारा    कालचा लोकसत्ताचा संघ आयोजित ज्ञानसंगमावरील अग्रलेख वाचला. सुरुवातीला थोडा विचार केला की, खरच संघातून एकही संशोधक, विचारवंत कसा तयार झाला नाही? ९० वर्षे लोक संघटीत करून कार्यकर्त्यांना केवळ नंदीबैलासारखे संघ वागवत होता का? असा प्रश्न मनात आला. पण अचानक लक्षात आले की, गेल्या ९० वर्षात एखादे ऑलम्पिक मेडल आणेल असा खेळाडू देखील संघाने तयार केला नाही. दररोज शाखेत २५ मिनिटे खेळ घेऊन देखील! मग पुन्हा लक्षात आले की, एखादा मोठा शिक्षण महर्षी म्हणता येईल असा शिक्षणसम्राट देखील तयार केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघाचा स्वयंसेवक म्हणवता येईल, असे एकही शंकराचार्य नाहीत. अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, देशातील एखादा नामवंत उद्योजक संघ घडवू शकला नाही. खरच संघात घडले ते केवळ नर्मदेचे गोटे..! परंतु लोकसत्तेचे एकांगी समीक्षण वाचून मत बनवले तर मी देखील तथाकथित संघाद्वेशी पुरोगामी गोटा ठरेल. संघाची स्थापना झाली तेव्हाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कदाचित या प्रश्नांचे उत्तर मिळू शकते (अर्थात तेवढ्या प्रामाणिकतेने या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर) भारताच्या स्वातंत