सूर्याचे आमंत्रण














सूर्य आला आमंत्रणाला, म्हटला "ये रे बाबा माझ्या गावाला"
आधी तर उठण्याचाच कंटाळा, मग ऐकण्याचा घोटाळा.
सुरुवातीस वाटले सूर्य कशाला बोलवेल त्याच्या गावाला?
म्हणून पुढले दोन दिवस मी सूर्यालाच टाळला, पण आमंत्रण देण्यास तो अजिबात नाही कंटाळला.
रोज रोजचे त्याचे आमंत्रण पाहून एके दिवशी विचारूनच टाकले,"असे काय आहे रे तुझ्या गावाला?" 

तिथे आहे का पुण्यासारखी हिरवळ आणि कोल्हापूरची मिसळ?
पैठण मधली साडी आणि BMW ची गाडी?
3G/4G चा लागतो का Call ? आणि Shopping करायला भेटतील का Mall?
whats app, Facebook चं आहे का रे Access? आणि Career बनवताना मिळेल का Success?
बरं ते सगळं राहू दे, तू सांग (दबलेल्या आवाजात)
Weekend ला पार्टी आणि Holidays ला सुट्टी मिळते का रे तुझ्या गावाला? 

माझी प्रश्नांची यादी संपल्या-संपल्या सूर्य म्हणाला,
"जिथे भौतिकतेचा प्रभाव असतो, तिथे माणूसकिचा आभाव असतो"
"म्हणजे…?", मी विचारले. 

सूर्य: तुमच्याकडे हिरवळ आणि मिसळचीच झगमग आहे, पण माझ्या गावात या पलिकडचे जग आहे.
गाडी आणि साडी एवढ्यावरच आम्ही अटकत नाही, माणूसकीची सवारी करताना आम्ही कधीच भटकत नाही.
निर्मळ पावन भावना हाच आमचा छंद आहे, 3G/4G चा Call करण्यात कसला रे अनुबंध आहे?
Success आणि Failure यावर Career आम्ही मोजत नाही, आमच्याकडची मैत्री फ़क्त Social media वर कुजत नाही.
हिम्मत-मेहनत-सत्य आमच्या आनंदाचे गणित आहे, शुध्द सात्विक प्रेम इथल्या प्रत्येकात अंकित आहे.     

त्याची सगळी उत्तरं ऐकून Conclusion ला बसलो मी, आणि काय……! स्वत:वरच हसलो मी.
कारण सूर्याच्या गावात सारेच काही सोहळे होते, पण त्याच्या आमंत्रणापुढे माझे प्रश्न अगदी खुळे होते.
सारे काही कळतानाही प्रश्न एक आला मनात, कधी असे घडेल रे माझ्या गावात?
उत्तर देताना सुर्याने सांगितली एकच गोष्ट, ज्याच्याने मनातील भाव झाले स्पष्ट. 

सूर्य म्हणाला,"विचार बदला जीवन बदलेल, जसे आहे गाव माझे तसा तुमचा देश घडेल.
दु:खितांच्या दु:खात एकदा सहभागी होऊन बघा,स्वार्थ कपटाचा स्वभाव एकदा तरी बदलून बघा.
मग परम आनंदाची वाट याच जगात सापडेल तुम्हास,सुपंथाच्या गमनाने परस्परांत वाढेल विश्वास.
एकमेकांचे सहाय्यक बनून नांदा गुण्यागोविंदाने,आमंत्रण माझे रोज स्विकारा अगदी खुल्या मनाने.
रोज असे आमंत्रण देणे हेच माझे काम आहे, जाईल तिथे उजळेल ज्योति स्विकारेल तो राम आहे."

- हर्षल कंसारा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....