पूरस्कार वापसी आणि बरचं काही




आज तसा निवांत वेळ होता, रविवार असल्यामुळे आँफिसला सुट्टी, त्यामुळे लवकर उठणं, तयार होऊन गाडी पकडणं अशी कसलीही गडबड नव्हती. म्हणूनच वाटलं थोड्या बातम्या बघाव्यात. जगात कुठला प्रश्न हँश टँग(#) वर आहे हे जाणण्याचे उत्तम साधन आहे मिडिया. म्हणूनच टि. व्ही. वर बातम्या सुरु केल्यात सुरुवातीस दुरदर्शनचे डि. डि. न्यूज लागले, त्यातील बातम्या बघुन लक्षात आले कि देशात प्रचंड प्रगती होतेय, युवाशक्तीच्या माध्यामातुन देशाला विकास तसेच प्रगतीपथावर नेणे शक्य आहे, नवीन सरकारची कामं पण जोरात सुरु आहेत. कुठे दुर्गम भागात पक्का रस्ता निर्माण करणे सुरु आहे, तर कुठे देशाचा GDP जोरात वाढत चाललाय. भारत जगातील अनेक नवनवीन देशांशी आपले संबंध दृढ करुन जागतिक पातळीवर आपले एक अनोखे स्थान निर्माण करतोय. जागतिक व्यापाराच्या अनेकानेक  संधी भारतात दाखल होताना दिसताय, तर कधी नवत भारतातील श्रीमंत लोकं Give_It_Up च्या माध्यमातून स्वत:हून गरिबांसाठी आपली गँस सबसिडी  सोडताय.  हे सगळं डि. डि. न्यूज वर पाहून मनाला प्रचंड समाधान लाभले. आपला देश नक्कीच प्रगती पथावर मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास निर्माण झालाच होता कि, मी न्यूज चँनेल बदलले...

       आता सरकारी न्यूज चँनेल बदलुन खाजगी न्यूज चँनेल बघायला सुरुवात झाली. येथे मात्र अगदी विपरित स्थिती होती. ठळक बातम्यांमध्ये वाचले “देशात हिंदुंनी केली मुस्लिमाची हत्या”, “दलितांना घरात कोंडुन जाळले”, “विचारवंताची काहि समाजकंटकांनी केली हत्या” देवा रे देवा……! माझ्या देशात एवढी अराजकता…! मग पुढे त्याच चँनेलवरील काही तज्ञांचे चर्चासत्र ऐकले. त्यातला प्रत्येक जण स्वत:ला महापुरुष अथवा महापुरुषाचा एकमेव वारस/ अनुयायी समजत असल्यामुळे ती चर्चा कमी भांडणच जास्त होते. असो… त्यातुन लक्षात आले की या अराजकतेवर संतापून देशातील साहित्यिक, इतिहासकार, दिग्दर्शक, वैज्ञानिक ही सारी मंडळी सरकारने दिलेला पुरस्कार परत करित आहेत.

      मग माझ्या मनात देखिल प्रचंड उदासिनता आणि भय निर्माण झालं. देशात एवढं सगळं चाललयं आणि मी या सर्वांपासून अनभिज्ञ कसा? एवढी विपरित परिस्थिती निर्माण झालीये…!, या देशाचं आता काही खरं नाही! 10 मिनीटांपुर्वी डि. डि. न्यूजच्या वृत्ताने खुश झालेला मी, आता मात्र व्यथित आणि भयभित झालो होतो. आता तर घराबाहेर निघायला देखिल कठिण आहे असा विचार मनात येत होता, तेवढ्यात आईचा स्वयंपाक घरातुन आवाज आला “ टि व्ही बंद कर आणि मंडईतुन भाजी आण रे बाळा… स्वयंपाकाला उशिर होईल मला…”
आईची हाक ऐकुन अजूनच चिंता वाढली. समाजात एवढी तेढ निर्माण झालेली असताना आता भर बाजारात कसा जाऊ…?
हिंदु आहे म्हणून अहिंदु गटाने हल्ला केला तर…?
दलित असतो तर सवर्णांनी हल्ला करण्याची भिती असती. अल्पसंख्यांक असतो तर बहुसंखियांची भिती वाटलीच असती.

देवा रे देवा…! आणि सकाळी न्यूज रिपोर्टर सांगत होता की हि सगळी स्थिती या नविन सरकार ने आणून ठेवलीअसल्याचे. एकंदर हाच विचार आणि या विचारची भिती मनात असताना देखिल आईची आज्ञा पाळण्याच्या हेतूने बाजारात जायला निघालो (भित भित). मंडई थोडी लांब असल्यामुळे आँटोनेच निघालो. प्रवासाला 20 मिनिटे लागणार असल्यामुळे मी माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार आँटोवाल्याशी गप्पा सुरु केल्या. माझ्या वडिलांच्या वयाच्या त्या आँटोवाल्या काकांना बोलता बोलता नाव विचारल्यावर लक्षात आले, काका मुस्लिम कुटुंबातुन असल्याचे. मग मला बातम्यांमधील विषयाचे स्मरण झाले आणि त्यातील मुद्द्यांवर मी काकांना प्रश्न विचारला. 
“दादरी घटना विषयी ऐकले का…?”
“हो” काका उत्तरले.
“मग तुम्हाला देखिल असुरक्षितता वाटत असेल ना या देशात”, “हिंदुंविषयी राग देखिल येत असेल ना…”,
जिज्ञासूपणे मी विचारले.
“अरे कसली असुरक्षितता?, कसला राग? एखाद्या घटनेवरुन संपुर्ण सामाजाचे परिक्षण करणे चुकिचे ठरते.“ पुढे बोलताना म्हटले   “कुण्या एका गावातील वातावरण खराब असताना आपण शांतता राखण्याचे काम करावे की आपले शहर देखिल तणावपुर्ण करावे…? ”
त्या साधारण मुस्लिम कुटुंबातील व्यक्तिचे उत्तर ऐकुन सकाळच्या बातम्यांनी/चर्चासत्रांनी व्यथित असलेल्या मला खुप मोठा दिलासा मिळत असतानाच काका पुढे बोलले,
“अरे बाबा ह्या सगळ्या कालबाह्य गोष्टी आहेत, बातम्या पाहून स्वत:चे मत बनवण्यापेक्षा समाजातील आसपासच्या माणसांच्या वगणुकी वरुन चाचपडुन पहाणे केव्हाही बरे.”
काकांच्या विचारांनी मी भारवून गेलोच होतो, सरकार बद्दल त्यांच मत काय असेल हे जाणण्यासाठी त्यांना विचारले, “मोदी सरकार बद्दल काय वाटते?, विकासाच्या नावाखाली मुस्लिमांचे खच्चीकरण करतय का हे सरकार?”
माझ्या प्रश्नावर हसत  काका उत्तरले, “जनधन योजने बद्दल ऐकलय का तु?”
मी होकार भरला.
“मग मला सांग, जनधनचे खाते उघडताना जाती आणि धर्माच्या आधारावर योजनेचे पैसे मिळतात का मोदी सरकार कडून…?”
“अरे, माझ्या सारख्या अनेक हात मजूरी करणार्या मुस्लिमांना यात सामिल होऊन स्वत:च्या कुटुंबासाठी बचत आणि साठवणुक करण्याचे सोपे आणि उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करुन दिले या सरकार ने आम्हाला. ”
“आमच्या सारख़्या गरिबांनी स्वप्नात देखिल विचार केला नव्हता, स्वत:च्या अथवा कुटुंबाच्या विमा विषयी, तो आज सरकार मार्फत काढला गेला. आणि राहिली गोष्ट असहिष्णुतेची तर 21 व्या शतकात आपण प्रगतिच्या विचारावर असण्यापेक्षा जर सहिष्णुता आणि असहिष्णुता यावर वाद करण्यातच धन्यता मानत असू तर आपण आपल्या समाजला मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय असं समजावं. 

      एक सामान्य आँटोवाल्याने, सांप्रदायाने भिन्न असलेल्या व्यक्तिने माझ्या सारख्या उच्चशिक्षित तरुणाचे जणू डोळेच उघडले होते, तेही एका छोट्याश्या संभाषणातून. मग मनात पुढे विचार आला की, जी गोष्ट माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिला पटु शकते, जी गोष्ट एका साधारण आँटोवाल्याला कळण्याजोगती आहे तीच गोष्ट या तथाकथित बुद्धिजीवी मंडळींना कशी नाही उमगली…? मिडिया तर या विषयाच्या आगित तेल ओतून ओतून स्वत:ची पोळी भाजत आहे. पुरस्कार परत करून समाजातील अराजकतेत तेल ओतण्यापेक्षा समाजात सद्भाव आणि शांती निर्माण करण्यात आपली बुद्धी आणि वेळ या मंडळींनी खर्ची घातला असता तर हि लोकं वंदनीयच ठरली असती. परंतू एका विशिष्ट स्वर्थाला प्रेरित होऊन, स्वत:चे अस्तित्व मिटण्याच्या केवळ धास्ती पायी या मंडळींची हि केविलवाणी हि धडपड सुरु आहे. पुरस्कार हा समाजाकडून चालवल्या जाणार्या सरकार कडुन प्रदान केलेला असतो, त्याला परत करुन आपण केवळ आपल्या विरोधीमतांनी चाललेल्या सरकारमधिल लोकांचाच नव्हे तर संपुर्ण समाजाचा अपमान करित आहोत याचे भानच विसरलिये हि मंडळी. या सगळ्यांत मला बाबासाहेब पुरंदरेंची आठवण आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तात्काळ त्या रक्कमेत स्वत:ची ख़ाजगीतील रक्कम जोडून रुग्णसेवेसाठी ती अर्पित करून टाकली. यातील मंडळींनी तर आपली गँस सबसिडी तरी सोडली असेल का? हाच प्रश्न मनात आहे. काही लोकं पुरस्कारची शोभा वाढवणारे असतात, तर काही फक्त शोभेसाठी पुरस्कार घेणारे ठरतात. परंतू अश्या सगळ्या लांडग्यांचा समाजाला खिळखिळा करण्याचा प्रयत्न आपल्या देशाने वेळोवेळी हाणून पाडलाय हे देखिल तितकेच खरे आहे. “डर नही तुफान, बादल का अंधेरी रात का, डर नही है धुर्त दुनिया के कपट की घात का.” अश्या माझ्या समाजावर किती जरी संकट आलीत तरी देखिल हा भारतीय समाज दुभंगवून स्वत:चा स्वार्थ साधणार्या लोकांना काळ समाजद्रोहि ठरविल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.   

-हर्षल कंसारा


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....