तुम्हावर केली मी मर्जी बहाल



तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ शरद पवार

सत्तेची तोरणं बांधून मातोश्रीवरती
ही डरकाळी बेगडी, उधळीते काळजातली भीती
जवळी यावं मला पुसावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम खुशाल

गुरगुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटल सत्तेचं कोडं
विरह जाळीता मला लाचारी पत्कारली मी खुशाल

मॅडम मॅडम अदबीनं तुम्ही विनवता सोनियाबाई
स्वाभिमानाचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच न घालवावी रात साजणा, कधीतरी व्हावी सत्तेची सकाळ

#Kansarastra

Comments

Popular posts from this blog

सोशल नेटवर्क साईटवर वाचलेली एक गोष्ट

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....