सूर्य कधी मावळत नसतो....


सूर्य कधी मावळत नसतो, मावळतो तो क्षण
मावळतात छटा काहीश्या, नसते मावळत प्राक्तन

सूर्याचे मावळणे, म्हणजे त्याचा अस्त नव्हे
क्षणभराची गाथा ही ,  जग नेहमीच अंधारग्रस्त नव्हे

सूर्याच्या जाण्याने असतील उंचावत काही शक्ती
आत्मविश्वासाची ही कसोटी बाळगू नका धास्ती

अंधाराचा होईल अस्त, मिटेल थैमानाचा गुन्हा
तेवत ठेवा विचार हा, की सूर्य उद्या उगवेल पुन्हा....


- हर्षल कंसारा


Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....