सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा….

 


     कधी कधी थोडे इतिहासात डोकावून पाहिले की काही गोष्टी अधिक स्पष्ट होतात. भारतावर मोहम्मद घोरी नावाच्या आक्रमकाने इ. स. 1100-1200 च्या काळात आक्रमण केले होते, राजा पृथ्वीराज चौहान त्यावेळी भारताचा सम्राट  होता. घोरीने पहिली स्वारी केली अनेक सैनीक, प्रचंड शस्त्रबळा सहीत, परंतू राजा पृथ्वीराज चौहनही काही कमी शूर नव्हता, त्याने घोरीच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पराभव केला व मोहम्मद घोरीला तलवारीच्या धारेवर धरले. आणि अचानक त्याच क्षणी घोरीला त्याच्या चूकांचा पश्चाताप झाला, त्याने त्वरीत राजा पृथ्वीराज चौहानची माफी मागून घेतली, आणि आमच्या राजाने युद्धधर्माचे पालन करित त्यास सहानुभूती दर्शवीत जिवंत सोडून दिले. परंतू पुन्हा आक्रमण नाही करणार तो मोहम्मद घोरी कसला. त्याने पुन्हा सैन्य, शस्त्र जमवीले, पुन्हा आक्रमण केले. राजा पृथ्वीराजने त्यास पुन्हा पराभूत केले आणि परभूत  होताच क्षणी घोरीस पुन्हा चुक केल्याचा पश्चाताप झाला, त्याने पुन्हा माफी मागितली आणि आमच्या राजानेही त्यास पुन्हा माफ करुन जिवंत सोडून दिले. असे एक वेळेला नाही, दोन वेळेला नाही तर तब्बल सोळा वेळी घडले. प्रत्येक पराभवाला घोरीस आपण केलेल्याचा पश्चाताप व्हायचा, आणि आमच्या राजाला देखिल त्याचे युध्दधर्म आठवायचे, राजा सहानुभूतीचा हात पुढे करत त्यास प्रत्येक वेळी जिवंत सोडायचा. परंतू सतराव्या युध्दाच्या वेळी आमचा राजाच युध्दात पराभूत झाला. यावेळेला पराभूतास माफी नाही दिली गेली, कारण फत्ते सुलतानांची झाली होती, हिंदु राजाची नव्हे. तेव्हापासून दिल्लीतील गादी ही सुलतानांच्या ताब्यात राहीली ती तब्बल 600 वर्षे.  या 600 वर्षात काय काय झाले, हे काय वेगळे सांगावयास नको. आमच्या पृथ्वीराज राजाची छोटीशी सहानुभूती देशाला किती महागात पडली याचे वर्णन आम्हाला इतिहासात भेटतेच. त्यामुळे सहानुभूती कोणास दाखवावी यावर आपण बोध नक्कीच घेतला पाहिजे.

    आपल्या देशात सध्या अशीच एक सहानुभूतीची लाट आलीये. मानवतेला धरून ही सहानुभूती योग्यच आहे, आपल्या गाडीखाली कुत्र्याचं पिलु आलं तरी देखिल आपणास दु:ख होतं, येवढा सहिष्णू समाज या देशात रहातो. त्यामुळे लहान लहान बालके शेजारच्या राष्ट्रात मारून टाकल्यास वेदना होणं भारतात स्वाभाविक आहे. परंतू सहानुभूती कोणास व कितपत असावी हे आपण इतिहासातून नाही शिकलो तर काय शिकलो असा प्रश्न उद्या जग आपणास विचारेल.

      तालिबान ही पाक लष्कर पुरस्कृत संघटना आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पाक लष्कर त्याचा उपयोग नेहमीच शेजारील राष्ट्रात अतिरेकी कारवाया घडविण्यासाठी करित आली आहे (शेजारील राष्ट्र म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान). इतरांना डसण्यासाठी घरात साप पाळायचा, या हेतूने पाकिस्तानने तालिबानची उभारणी केली. परंतू साप तो सापच असतो, त्यामुळे तो घरात सुध्दा डंख मारणारच हे पाक लष्कर विसरून गेली होती, तालिबाननी परवा फक्त त्याची आठवण पाक लष्करास करून दिली. येवढेच परवा घडले बाकी काही नाही, त्यामुळे जास्त मानवतेचा आव आणण्याची काहीही आवश्यकता नाहिये.  पाक ला त्याच्या कर्माचे भोग मिळाले आहेत, आपण दाखविलेल्या सहानुभूतीमुळे पाकिस्तानचा दृष्टीकोन भारता संबंधी तसूभर देखिल बदलणार नाही. उलट आता पाक लष्कर आधिक मजबूत होईल, उद्या तालिबान अथवा भारत यांपैकी कोणास आधी संपवायचे असे पाक लष्करा समोर आल्यास ते तालिबान्यांशी मैत्री प्रस्थापीत करून भारताला संपवण्यास पहिले प्रधान्य देतील हे आपण विसरायला नको. भारत हा पाकिस्तानचा शत्रू नं. 1 आहे, हे सहानुभूतीच्या लाटेत आपण विसरु शकतो परंतू पाकिस्तान कधीच विसरणार नाही.  26/11 च्या  मेणबत्त्या आपल्या देशात अजुन जाळल्या जातात, आज आपण त्याच मेणबत्त्या पेशावर घटनेसाठी जाळतोय, परंतू जास्त सहानुभूतीचा पुळका केल्यास उद्या आपल्यासाठी मेणबत्त्या जाळायला कुणी उरणार नाही हे लक्षात ठेवा. एका सहानुभूतीमुळे किती मोठी किंमत आपणास इतिहासात मोजावी लागलिये हे आपल्याला चांगलेच  ठाऊक आहे. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा एवढेच सांगिन.

- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....