कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....


आयुष्याचा झालाय लॉकडाऊन
सिच्युएशन झालीये हँग
कोरोनाचा व्हायरस नव्हे
हा तर देवाचा प्रँक....

हव्यासापोटी केलीस तू निसर्गाची हानी
उघडे पाडलेस जीव, बेघर केले प्राणी
रानं-वनं जाळून आणली औद्योगिक क्रांती
वासनांधतेमुळे तुझ्या सृष्टीचक्राची रे भ्रांती 
तुझ्या ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वाजलाय व्यवस्थांचा बँड
कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....१

लाईफस्टाईलच्या नावाने केल्यात कैक कामना
क्वारंटाईनमध्ये लपशिल कुठवर? कर निसर्गाचा सामना!
अणु - रेणूच्या आविष्काराने बनवलेत मिसाईल
हॅकिंगास्त्राने अनलॉक केल्यात कंप्युटरच्या फाईल
पण निसर्गाची किमया पाहा...
अदृश्य एका विषाणूने केली तुझी दिनचर्या हँग
कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....२

तुझ्या या वागण्यात आता सुधारणा कर
निसर्गाचं ओरबडण्यापेक्षा,घाल त्यात भर 
प्रदूषणाच्या विळख्यातून कर भुमातेला मुक्त
अनावश्यक टाळ, गरजेपुरते घे फक्त
साधी जीवनशैली अंगिकारून वाढव मानवतेचा रँक
कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....३

- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज