अमृताताई तुमच्या 'जाण'कारीसाठी


प्रसंग १ :

अनिता बिज्या वसावे रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार आपले डी.एड. संपवून नोकरीच्या शोधात होती. तिची नेमकी गरज ओळखू एका ख्रिश्चन प्रचारीकेने तिला एस. . मिशन या शाळेत नोकरी दिली. आई-वडील तिच्या नोकरीने सुखावले गेले असता अचानक काही दिवसांनी २८ नोव्हेंबर २०१६ ला तिचा, भावाला पाँडिचेरीहून फोन आला व तेथून परत येण्याकरिता भावाला ३००० रुपयाची तिने मागणी केली. भावाने तिच्या म्हणण्यानुसार पैसे पाठविले व १७ डिसेंबर २०१६ ला परत येणार असल्याचे तिने कळविले देखील, मात्र अनिता घरी परतली नाही. अचानक ९ डिसेंबर २०१६ ला आरशी तडवी नावाचा इसम अनिताच्या घरी जाऊन आई-वडिलांना पाँडिचेरी येथे घेऊन गेला. तेथे जाऊन लक्षात की अनिताचा मृत्यू झाला आहे. पालकांनी मृत्यूची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तसेच तिच्या प्रेताला देखील हात लावू दिला नाही, आणि प्रेताचे अंतिमसंस्कार वनवासी परंपरेनुसार न करू देता जबरदस्तीने ख्रिश्चन पद्धतीने करण्यास भाग पाडले.







हताश पालक पाँडिचेरी येथे कुठलीही कायदेशीर कारवाई करू शकले नाही. २४ डिसेंबर २०१६ रोजी आदिवासी सुरक्षा मंचाच्या व्यासपीठावरून त्यांनी स्वत: सहित संपूर्ण वनवासी समाजाची व्यथा मांडली तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. वर्षानुवर्षे वनवासींचे धर्मान्तरण करण्याचे काम ख्रिश्चन मिशनरी नंदुरबार जिल्ह्यात करीत आहे. त्यामुळे वनवासी समाजाने हे किती दिवस सहन करायचे? असा प्रश्न उभा राहिला होतावनवासी समाजाला आपली संस्कृती टिकवून ठेवायची आहे, तेथे मिशनरी त्यांना जोर जबरदस्तीने, आमिषाने धर्मांतरण करण्यास भाग पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वनवासी समाजाचा प्रश्न ऐरणीवर आला.

प्रसंग २ : 

चिंचपाडा ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे एकदा(२००८ साली) प्रवासाला गेलो असता एक वेगळेच दृश्य पहिले. तेथे एक ख्रिश्चन पादरी एका बादलीत पाणी घेऊन समोर उभ्या असलेल्या काही वनवासी बांधवांना सांगत होता की, एके दिवशी ही पृथ्वी पाण्यात बुडून जाणार आहे. त्यावेळेला तुमचा देव तुम्हा सर्वांना वाचवायला नक्कीच येईल. दगड धोंडांची पुजाकारणाऱ्या हिंदू वनवासींच्या देवाचे प्रतिक म्हणून एक मोठा धोंडा घेऊन त्याने पाण्यात टाकला, आणि म्हणाला, “अरे हे काय तुमचा देव तर त्या पाण्यात बुडाला..!!” नंतर त्याने प्लास्टिकचे क्रॉस त्याच पाण्यात टाकले. स्वाभाविक प्लास्टिक असल्यामुळे ते तरंगायला लागले आणि भोळ्या भाबड्या तसेच साधे अक्षर ही वाचू न शकणाऱ्या वनवासी बांधवांना पटवून सांगितले की, बघा आमचा देव या पाण्यावर तरंगतो आहे. तो तुम्हाला देखील तारेल, तेव्हा दुबळ्या अशा धोंडाच्या देवाची पूजा कशाला करता....?

माझे वय खूप लहान असल्यामुळे या प्रकारावर व्यक्त होणे तेव्हा जमले नव्हते, मात्र आता त्याची आठवण काढली तरी देखील चीड येते. आज चिंचपाडा हे गाव जवळपास ६०% पेक्षा अधिक ख्रिश्चन धर्मात परावर्तीत झालेले आहे, आणि संपूर्ण नवापूर तालुक्यात देखील त्याच गतीने धर्मांतरण घडून आलेले आहे. त्यागावात हिंदुत्व म्हणून काही गतीविधी केल्यास प्रखर विरोधाला कसे सामोरे जावे लागते याची जाणीव तुम्हाला धरमपेठ अथवा वर्षा बंगल्यात बसून होणार नाही.


प्रातिनिधिक स्वरुपात केवळ दोनच प्रसंगे लिहिली आहेत, अशी १५-२० प्रसंगे अजून सांगण्यासारखी आहेत. परंतु सगळीच सांगत बसणार नाही. तुम्ही एक हुशार आणि नावलौकिक मिळविलेल्या बँकर आहात, अत्यंत उत्कृष्ट गाणी गाऊ शकतात, त्याचबरोबर समाजसेवेची तुम्हाला भरपूर आवड आहे. या सगळ्याचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुम्ही काय करावे अथवा करू नये हे सांगण्याचा मला अजिबात अधिकार नसला तरी देखील महराष्ट्राच्या मुख्यमंत्रीची पत्नी म्हणून जेव्हा तुम्ही वावरतात तेव्हा काही खटकणाऱ्या मुद्द्यावर टिप्पणी करणे गरजेचे होऊन जाते. तुमच्या सारखे प्रसिद्ध व्यक्तिमत्व जेव्हा छुप्या पद्धतीने उघड-उघड धर्मांतरण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहते, तेव्हा मला माझ्या जिल्ह्यातील वनवासी बांधवांची व्यथा आठवते. बी-संता मोहिमेचे उद्घाटन करणे तुमच्यासाठी एखादा समाजसेवेचा उपक्रम असेल, किंवा प्रसिद्धी मिळविण्याचा एक स्टंट, मात्र यामाध्यमातून समाजात जो संदेश जातो त्यामुळे धर्मांतरण करणारी ही मंडळी अधिक शक्तिशाली बनत जाते. त्याचे परिणाम तुम्हाला वर्षा बंगल्यात राहून दिसत नाहीत, आम्हाला वनवासी भागात प्रत्यक्षपणे जाणवतात. शहरी भागात गोड-गोंडस समाजसेवेची लाल टोपी घालून फिरणारी ही मंडळी जेव्हा नंदुरबार सारख्या दुर्गम आणि वनवासी जिल्ह्यात वेगळ्या ख्रिस्तीलँडची मागणी करून तेथील प्रमुख समाजाला देशाच्या मुख्य धारेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी प्रत्यक्ष दर्शनी पाहिल्यामुळे अतिशय दु:ख होते. आपल्यासारख्या सुशिक्षित आणि हुशार महिलेने अशा बाबींच्या समर्थनार्थ उतरल्यावर तर दु:खाची सीमा ओलांडली जाते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात काय करावे हा माझा प्रश्न नाही. मात्र त्याचा विपरीत परिणाम होऊन समाजातील अंतिम व्यक्तीला त्याचे चटके सोसावे लागत असतील तर त्या अंत्योदयाची ज्योत तेवत राहण्यासाठी नक्कीच लिहावे लागते.

-        हर्षल कंसारा,
मु. पो. ता. तळोदा, जि. नंदुरबार

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....