जर असते इंटरनेट महाभारत काळात....




जर असते इंटरनेट महाभारत काळात....
तर नसते गेले श्रीकृष्ण द्रौपदीच्या चीरहरणात, तिच्या बचावला..
त्यांनी देखील केला असता डी.पी. आपला ब्लॅक
नसता घडला द्यूताचा तो खेळ...
ऑनलाईन मिटिंगनेच कदाचित साधला असता मेळ
दु:शासनाने देखील डायरेक्ट वस्त्र हरणाऐवजी तिला केले असते ट्रोल...
#द्रौपदी हॅशटॅगचे, त्यासभेत निराळेच असते मोल
धृतराष्ट्राने कदाचित ट्विट करूनच केली असती घटनेची ‘कडी निंदा’
आणि केवळ बोर्ड घेऊनच उभी राहिलेली गांधारी म्हटली असती "मैं शर्मिंदा...मैं शर्मिंदा..."

जर असते इंटरनेट महाभारत काळात....
तर खरोखर झाले असते का हो युद्ध...?
की व्हर्च्युअल जगात कौरव पांडवांची सायबर सेल झाली असती कटिबद्ध?
ब्रम्हास्त्र देखील ठरले असते हॅकींग पुढे फोल...
कुरुक्षेत्रातील फेसबुकने अनेकांचा डेटा, विकला असता कवडीमोल
आणि केंब्रीज अॅनालिटीकाने त्यामध्ये नक्कीच केला असता झोल...
तुटलेल्या चाकाचा रथ कर्णाने olxवर दिला असता विकून...
आणि अभिमन्यूने देखिल चक्रव्यूह यूट्यूबवरुन घेतले असते ना शिकून...

जर असते इंटरनेट महाभारत काळात....
तर संभ्रमी पार्थाला सावरण्यासाठी श्रीकृष्णाने विराट रूपाऐवजी एखादा अॅनिमेशन शो दाखवला असता
आणि त्यातून प्रेरित झालेला अर्जुन, युद्धाआधी ‘फ्युचर स्कोप’नेच सुखावला असता....
नसते झाले द्वंद्व भीम आणि दुर्योधानामध्ये....
एकमेकांना ब्लॉक करूनच विषय त्यांनी संपवला असता...
धर्माचे वचन म्हणून युधिष्ठीरचे quotes सोशल मीडियात गाजले असते...
 पालन होत नाहीत म्हणून ते बेगडी लाजले नसते...

जर असते इंटरनेट महाभारत काळात....
तर इतिहास काही औरच राहिला असता...
कदाचित धर्माची स्थापना हा विषय जातीय ठरला असता
नसता एवढा शहाणपणा, प्रत्येक बाजू तपासण्याचा...
तोलून मापून वागण्यापेक्षा, कल असता नाक आपले खुपसण्याचा

- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....