विचारांना काय लागते?



विचारांना काय लागते?

थोडी पार्श्वभूमी, थोडासा ध्यास
थोडे स्वप्न, थोडा अभ्यास

थोडी लागते आशा, थोडी निराशा ही
थोडी पाहिजे आभा, थोडी अभिलाषा ही

थोडे क्षण लागतात आनंदाचे, अभिमानाचे, उत्साहाचे 
थोडे प्रसंग हवे दुःखाचे, अपयशाचे, निरुत्साहाचे

थोडे असावे सहमतीचे, थोडे असहमतीचे ही
थोडी हवी गती, ज्याने विचार नवा आकार घेई

थोडे बाळगावे मुद्दे, थोडे प्रसंग
थोडी असावी जिद्द, थोडा व्यासंग

थोड्या थोड्या गोष्टींतून, विचाराचा जन्म होतो
थोडे पडत थोडे धडपडत, तोही परिपक्व होतो

- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....