कौरवसेनेचा टाहो


दुर्योधनाची मांडी फोडताच, कौरवसेना अधर्म-अधर्म ओरडायला लागली
अभिमन्युला चक्रव्युहात अडकवून तहान ज्यांची होती भागली!!

साधन-शुचीतेचे पुराण ज्यांना आता लागले आहे आठवू
चित्रगुप्ताला ही पडला असेल प्रश्न, त्यांना नेमके कुठे पाठवू?

चिरहारण होणाऱ्या सभेत भिष्मासम राहिले होते मौन
पांचालीचा अपमान तेव्हा वाटला होता गौण

अबला द्रौपदीला पाहून, सभेत शड्डू जेव्हा ठोकला होता
हे राधासुता तेव्हा तुझा धर्म नेमका कुठे भरकटला होता?

#Kansarastra

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....