आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो

आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो ॥
पहिला प्रश्न होता माझा…
अरुणाच्या सारथ्याने तू तर रोज येतो
जीवनदायी किरणांनी तुझ्या, ही सृष्टी बहरवितो
timing सगळी जुळविण्यासाठी तू कुठले रे App वापरतो…?
प्रश्नावरती माझ्या सुर्य खुद्कन हसला आणि उत्तराच्या स्वरात उद् गारला…
App वापरण्याची  असेल तुम्हास सक्ती
मनात माझ्या केवळ सेवा सृष्टीची
मनाची शक्ती असते अनोखी
सारेच timing सहज जुळविती…॥
दुसरा प्रश्न मनात आला…
प्रातःकाळाचे रुप तुझे किती रे मनमोहक असते
निर्मल कोमल किरणांकडे अगदि पहावेसे वाटते
पण वेळेसोबत ताप तुझा वाढत रहातो
सायंकाळी पुन्हा रुप तुझे ते शांत होते
हे Temperature maintenance तुला कसे रे जमते?
उत्तर द्यायला सुर्य म्हणाला…
वेळेनुसार वागता आलं पाहिजे
योग्य वेळेला योग्य तापता आलं पाहिजे
Temperature maintenance काय मोठी गोष्ट आहे…!!
जगाच्या कल्याणासाठी निरंतर राबता आलं पाहिजे…॥
मग मी तिसर्या प्रश्नाकडे वळलो…
तुझ्या उदयाने  ही सृष्टी जागते
अनेकांची क्षुधा भागते
तू चैतन्याची मूर्ती असूनही
तूला कधी कधी ग्रहण का लागते?
गंभीर स्वरात सुर्य उत्तरला…
ग्रहणकाल म्हणजे अग्निपरिक्षा
त्यात होते माझी समिक्षा
जरी जगाने केली माझी उपेक्षा
तरी टाकत नाही मी सतत भ्रमणाची दिक्षा…॥
सुर्याचे हे उत्तर ऐकून सारेच प्रश्न मावळले
सुर्यासारखे बनण्याचे आपसूक मनाने निर्धारले
तेजपूंज या सुर्यासारखा मी ही आतून पेटलो
धन्य जहालो आज सकाळी लवकर उठलो आणि सुर्यनारायणाला भेटलो ॥
-हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....