घरटे



सांजवेळी सूर्यास्ताला नभ केसरी रंगला
घरट्याची तव ओढ लागे बघा पाखराला

पाखराचा जीव रमे त्या इवल्याशा घरट्यात
उंच नभातून मोर्चा वळे दाट माळरानात

कुठल्याश्या फांदीवरी घरटे त्या पाखराचे
कोसावानी आकार जरी इमले त्याच्या स्वप्नांचे!

दाना-पाणी-चारा-काडी यातून बनले घरटे
खुले असे नभ जरी मन येथेचं रमते

जीव विसावतो येथे, क्षुधा येथे क्षमते
लळा स्वकियांचा जेथे, तेथे भीती सारी संपते!

वात्सल्याची छाया असे, असे आप्तांची माया 
प्रेम, लळा, जिव्हाळा ही तर घरट्याची किमया!!

- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....