Posts

ऋग्वेद.....

Image
ऋग्वेद..... तुझ्या जाण्याच्या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही रे मित्रा... भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द वापरताना हात थरथरताय, आणि अश्रू तर सकाळ पासून ओघळताय... 😭😭 हे तुझं वय होतं का...?  ऋग्या अरे...!! मला आपली पहिली भेट आठवली,  मुंबईत एका टेबलवर बसून नाश्ता करत असताना तुझी झालेली ओळख. "मी, ऋग्वेद कुलकर्णी, धाराशिव जिल्ह्यातील कळंबचा" तुझ्या त्या नेहमीच्या टोनमध्ये बोलला होतास... तुझी प्रचंड आकलन क्षमता, बुद्धी चातुर्य, शब्दांवर असलेली पकड, बोलण्यातला गंभीरपणा... सगळं सगळं आठवतंय रे मला!  मुंबईत भेटलेला सर्वात जवळचा मित्र होतास तू. रात्र रात्रभर तुझ्या सोबत राजकारण विषयाच्या गप्पा ... आपल्या दोघांचा समान आवडीचा विषय तो, तात्विक विश्लेषण, प्रत्येक गोष्टीचा सखोल अँगल सगळंच असायचं तुझाकडे. वाळकेश्र्वर ते चर्चगेट  जवळपास ४.५ किमीचा रस्ता आपल्याला गप्पा मारता याव्या म्हणून आपण कितीतरी वेळा पायी सर केलेला!!  आपलं शेवटचं संभाषण पण अलौकिक होतं, त्यात श्रीकृष्णाने महाभारतात भीष्म, द्रोणाचार्य, आणि कर्णाच्या अंतिम क्षणांत केलेल्या संभाषणावर चर्चा रंगली होती ...

अडीग आणि अविचल

Image

पतझड़

Image
पतझड़ के मौसम में कुछ हरियाली के पत्ते कुछ पीले, कुछ सूखे, कुछ हरे-भरे लपकते हरियाली का होता पतझड़ में अलग मिजाज छूटे जाते पराए, अपनों का केवल साज यू ना रुठो पतझड़ से, यह तो एक मुकाम हरियाली की भी आएगी, रंगीन बनेगी शाम।। - हर्षल

घरटे

Image
सांजवेळी सूर्यास्ताला नभ केसरी रंगला घरट्याची तव ओढ लागे बघा पाखराला पाखराचा जीव रमे त्या इवल्याशा घरट्यात उंच नभातून मोर्चा वळे दाट माळरानात कुठल्याश्या फांदीवरी घरटे त्या पाखराचे कोसावानी आकार जरी इमले त्याच्या स्वप्नांचे! दाना-पाणी-चारा-काडी यातून बनले घरटे खुले असे नभ जरी मन येथेचं रमते जीव विसावतो येथे, क्षुधा येथे क्षमते लळा स्वकियांचा जेथे, तेथे भीती सारी संपते! वात्सल्याची छाया असे, असे आप्तांची माया  प्रेम, लळा, जिव्हाळा ही तर घरट्याची किमया!! - हर्षल कंसारा

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....

Image
आयुष्याचा झालाय लॉकडाऊन सिच्युएशन झालीये हँग कोरोनाचा व्हायरस नव्हे हा तर देवाचा प्रँक.... हव्यासापोटी केलीस तू निसर्गाची हानी उघडे पाडलेस जीव, बेघर केले प्राणी रानं-वनं जाळून आणली औद्योगिक क्रांती वासनांधतेमुळे तुझ्या सृष्टीचक्राची रे भ्रांती  तुझ्या ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वाजलाय व्यवस्थांचा बँड कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....१ लाईफस्टाईलच्या नावाने केल्यात कैक कामना क्वारंटाईनमध्ये लपशिल कुठवर? कर निसर्गाचा सामना! अणु - रेणूच्या आविष्काराने बनवलेत मिसाईल हॅकिंगास्त्राने अनलॉक केल्यात कंप्युटरच्या फाईल पण निसर्गाची किमया पाहा... अदृश्य एका विषाणूने केली तुझी दिनचर्या हँग कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....२ तुझ्या या वागण्यात आता सुधारणा कर निसर्गाचं ओरबडण्यापेक्षा,घाल त्यात भर  प्रदूषणाच्या विळख्यातून कर भुमातेला मुक्त अनावश्यक टाळ, गरजेपुरते घे फक्त साधी जीवनशैली अंगिकारून वाढव मानवतेचा रँक कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....३ - हर्षल कंसारा

मधुबन अंबर

Image
चांद सी जगमगाती, शीतल, सुंदर बादलों की परछाई से छुपकर आगे आगे बढ़ती जाती,  रातें कटती, बाते चलती उस चंद्रकिरण की रोशनी में! फिर चांद भी मुस्कुराकर खिल उठा उस प्रेम गीत पर चांदनी नाचे उसी धुनपर आज बना, मधुबन अंबर उस नित नए आंगन में ! - हर्षल

कौरवसेनेचा टाहो

Image
दुर्योधनाची मांडी फोडताच, कौरवसेना अधर्म-अधर्म ओरडायला लागली अभिमन्युला चक्रव्युहात अडकवून तहान ज्यांची होती भागली!! साधन-शुचीतेचे पुराण ज्यांना आता लागले आहे आठवू चित्रगुप्ताला ही पडला असेल प्रश्न, त्यांना नेमके कुठे पाठवू? चिरहारण होणाऱ्या सभेत भिष्मासम राहिले होते मौन पांचालीचा अपमान तेव्हा वाटला होता गौण अबला द्रौपदीला पाहून, सभेत शड्डू जेव्हा ठोकला होता हे राधासुता तेव्हा तुझा धर्म नेमका कुठे भरकटला होता? #Kansarastra