Posts

प्रश्न केवळ मंदिराचा नाही, खरा प्रश्न आमच्या आदर्शांचा

Image
अनेक वेळेला राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा ऐकली आहे. "मंदिर तेथेच बनले पाहिजे", पासून तर, "छे छे मंदिराने कुणाच्या ताटात भाकरी येणार का? मग कशाला त्याच्या भानगडीत पडायचे," इथपर्यंतचे सर्व तत्वज्ञान ऐकायला मिळते. परंतु मूळ प्रश्न शिल्लक राहून जातो तो म्हणजे, आपल्या आदर्शांचा.... मंदिराचा आणि आदर्शांचा काय संबंध? असा देखील प्रश्न कुणाला पडू शकेल. परंतु असा प्रश्न निर्माण होणे म्हणजेच या देशाच्या मूळ आदर्शापासून थोडे अंतर बाळगण्यासारखे आहे. म्हणजे, मी जेव्हा जेव्हा शिवरायांचा पुतळा पाहतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या गड-किल्ल्यांवर गेल्यानंतर मनात हिंदवी स्वराज्यासारखे देशासाठी कालानुरूप काहीतरी करण्याचा विचार स्पर्श करून जातो. मी शिवरायांचे चरित्र पुस्तकात वाचले आहे, त्यांच्या सगळ्या कथा मला तोंडपाठ आहेत, त्यांच्यावर आधारित मालिका, नाटक, डॉक्युमेंट्री सगळ्या मी पहिल्या आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड इत्यादी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकी ज्ञानापेक्षा एक वे...

गुळगुळीत गोट्यांकडून सणसणीत

Image
-   हर्षल कंसारा    कालचा लोकसत्ताचा संघ आयोजित ज्ञानसंगमावरील अग्रलेख वाचला. सुरुवातीला थोडा विचार केला की, खरच संघातून एकही संशोधक, विचारवंत कसा तयार झाला नाही? ९० वर्षे लोक संघटीत करून कार्यकर्त्यांना केवळ नंदीबैलासारखे संघ वागवत होता का? असा प्रश्न मनात आला. पण अचानक लक्षात आले की, गेल्या ९० वर्षात एखादे ऑलम्पिक मेडल आणेल असा खेळाडू देखील संघाने तयार केला नाही. दररोज शाखेत २५ मिनिटे खेळ घेऊन देखील! मग पुन्हा लक्षात आले की, एखादा मोठा शिक्षण महर्षी म्हणता येईल असा शिक्षणसम्राट देखील तयार केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघाचा स्वयंसेवक म्हणवता येईल, असे एकही शंकराचार्य नाहीत. अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, देशातील एखादा नामवंत उद्योजक संघ घडवू शकला नाही. खरच संघात घडले ते केवळ नर्मदेचे गोटे..! परंतु लोकसत्तेचे एकांगी समीक्षण वाचून मत बनवले तर मी देखील तथाकथित संघाद्वेशी पुरोगामी गोटा ठरेल. संघाची स्थापना झाली तेव्हाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कदाचित या प्रश्नांचे उत्तर मिळू शकते (अर्थात तेवढ्या प्रामाणिकतेने या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर) भार...

तेवढेच शुद्ध तेवढेच सात्विक - भाग १

गेल्या वर्षी विजयादशमीला नागपूर जाण्याचा योग आला. मा. मनमोहनजींना(मनमोहनजी वैद्य, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख) भेटण्यासाठी वेळ मागितला होता तेव्हा, "नागपूरला ये , तेथे निवांत भेटता येईल." असे मनमोहनजी म्हटल्यामुळे नागपूर जाणे पक्के झाले. विजयादशमीला नागपूर जाणे म्हणजेच रेशीमबागेतला उत्सव पहायला मिळणार, आणि  रेशीमबागेतला विजयादशमी  उत्सव बघण्याचा योग काय असतो, ते संघ स्वयंसेवक असल्याशिवाय कळणे महाकठीण ...! तरी देखील थोडे समजविण्याचा प्रयत्न करतो. संघाची सुरुवात  नागपूर पासून झालीये, त्यामुळे तेथील संघकाम, प्रत्यक्ष पूजनीय डॉ. हेडगेवारांसोबत काम केलेले अनेक कार्यकर्ते असणारे नगर म्हणजेच नागपूर, थोडक्यात 'संघाची पंढरीच'. अश्या ठिकाणाचा संघ स्थापना दिनाचा उत्सव बघणे म्हणजेच, मन आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तिरी न्हाऊन निघण्यासारखेच असते स्वयंसेवकांसाठी. त्यामुळेच नागपूर जाण्याची मनात Excitement होतीच.    तेथे मनमोहनजी शिवाय माझी कुणाशीच ओळख नाही, ही बाब स्वतः मनमोहनजी जाणून असल्यामुळे, माझी सकाळी थांबण्याची व्यवस्था, स्टेशन जवळ घर असलेल्या एका का...

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

Image
आज तसा निवांत वेळ होता, रविवार असल्यामुळे आँफिसला सुट्टी, त्यामुळे लवकर उठणं, तयार होऊन गाडी पकडणं अशी कसलीही गडबड नव्हती. म्हणूनच वाटलं थोड्या बातम्या बघाव्यात. जगात कुठला प्रश्न हँश टँग(#) वर आहे हे जाणण्याचे उत्तम साधन आहे मिडिया. म्हणूनच टि. व्ही. वर बातम्या सुरु केल्यात सुरुवातीस दुरदर्शनचे डि. डि. न्यूज लागले, त्यातील बातम्या बघुन लक्षात आले कि देशात प्रचंड प्रगती होतेय, युवाशक्तीच्या माध्यामातुन देशाला विकास तसेच प्रगतीपथावर नेणे शक्य आहे, नवीन सरकारची कामं पण जोरात सुरु आहेत. कुठे दुर्गम भागात पक्का रस्ता निर्माण करणे सुरु आहे, तर कुठे देशाचा GDP जोरात वाढत चाललाय. भारत जगातील अनेक नवनवीन देशांशी आपले संबंध दृढ करुन जागतिक पातळीवर आपले एक अनोखे स्थान निर्माण करतोय. जागतिक व्यापाराच्या अनेकानेक   संधी भारतात दाखल होताना दिसताय, तर कधी नवत भारतातील श्रीमंत लोकं Give_It_Up च्या माध्यमातून स्वत:हून गरिबांसाठी आपली गँस सबसिडी   सोडताय.   हे सगळं डि. डि. न्यूज वर पाहून मनाला प्रचंड समाधान लाभले. आपला देश नक्कीच प्रगती पथावर मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास निर्...

सोशल नेटवर्क साईटवर वाचलेली एक गोष्ट

Image
एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले. हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?" "साहेब" भिकारी म्हणतो, "माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा." तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो. त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन हो...

सूर्याचे आमंत्रण

Image
सूर्य आला आमंत्रणाला, म्हटला "ये रे बाबा माझ्या गावाला" आधी तर उठण्याचाच कंटाळा, मग ऐकण्याचा घोटाळा. सुरुवातीस वाटले सूर्य कशाला बोलवेल त्याच्या गावाला? म्हणून पुढले दोन दिवस मी सूर्यालाच टाळला, पण आमंत्रण देण्यास तो अजिबात नाही कंटाळला. रोज रोजचे त्याचे आमंत्रण पाहून एके दिवशी विचारूनच टाकले,"असे काय आहे रे तुझ्या गावाला?"   तिथे आहे का पुण्यासारखी हिरवळ आणि कोल्हापूरची मिसळ? पैठण मधली साडी आणि BMW ची गाडी? 3G/4G चा लागतो का Call ? आणि Shopping करायला भेटतील का Mall? whats app, Facebook चं आहे का रे Access? आणि Career बनवताना मिळेल का Success? बरं ते सगळं राहू दे, तू सांग (दबलेल्या आवाजात) Weekend ला पार्टी आणि Holidays ला सुट्टी मिळते का रे तुझ्या गावाला?   माझी प्रश्नांची यादी संपल्या-संपल्या सूर्य म्हणाला, "जिथे भौतिकतेचा प्रभाव असतो, तिथे माणूसकिचा आभाव असतो" "म्हणजे…?", मी विचारले.   सूर्य: तुमच्याकडे हिरवळ आणि मिसळचीच झगमग आहे, पण माझ्या गावात या पलिकडचे जग आहे. गाडी आणि साडी एवढ्यावरच आम्ही अटकत नाही, म...

सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा….

Image
       कधी कधी थोडे इतिहासात डोकावून पाहिले की काही गोष्टी अधिक स्पष्ट होतात. भारतावर मोहम्मद घोरी नावाच्या आक्रमकाने इ. स. 1100-1200 च्या काळात आक्रमण केले होते, राजा पृथ्वीराज चौहान त्यावेळी भारताचा सम्राट  होता. घोरीने पहिली स्वारी केली अनेक सैनीक, प्रचंड शस्त्रबळा सहीत, परंतू राजा पृथ्वीराज चौहनही काही कमी शूर नव्हता, त्याने घोरीच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पराभव केला व मोहम्मद घोरीला तलवारीच्या धारेवर धरले. आणि अचानक त्याच क्षणी घोरीला त्याच्या चूकांचा पश्चाताप झाला, त्याने त्वरीत राजा पृथ्वीराज चौहानची माफी मागून घेतली, आणि आमच्या राजाने युद्धधर्माचे पालन करित त्यास सहानुभूती दर्शवीत जिवंत सोडून दिले. परंतू पुन्हा आक्रमण नाही करणार तो मोहम्मद घोरी कसला. त्याने पुन्हा सैन्य, शस्त्र जमवीले, पुन्हा आक्रमण केले. राजा पृथ्वीराजने त्यास पुन्हा पराभूत केले आणि परभूत  होताच क्षणी घोरीस पुन्हा चुक केल्याचा पश्चाताप झाला, त्याने पुन्हा माफी मागितली आणि आमच्या राजानेही त्यास पुन्हा माफ करुन जिवंत सोडून दिले. असे एक वेळेला नाही, दोन वेळेला नाही तर तब...