Posts

सूर्य कधी मावळत नसतो....

Image
सूर्य कधी मावळत नसतो, मावळतो तो क्षण मावळतात छटा काहीश्या, नसते मावळत प्राक्तन सूर्याचे मावळणे, म्हणजे त्याचा अस्त नव्हे क्षणभराची गाथा ही ,  जग नेहमीच अंधारग्रस्त नव्हे सूर्याच्या जाण्याने असतील उंचावत काही शक्ती आत्मविश्वासाची ही कसोटी बाळगू नका धास्ती अंधाराचा होईल अस्त, मिटेल थैमानाचा गुन्हा तेवत ठेवा विचार हा, की सूर्य उद्या उगवेल पुन्हा.... - हर्षल कंसारा

थंडीत पडलेले उबदार प्रश्नं

Image
देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  आपल्या फसलेल्या राजकारणामुळे सत्तेपासून लांब गेलेल्या या राजकारण्यांना थंडीच्या दिवसात जी उबदार स्वप्ने पडू लागली आहेत, ती सहजासहजी साकारली जातील, याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर काल बहुचर्चित अशी मुलाखत रंगली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  महत्वाच्या प्रश्नांना बगल महाराष्ट्राला पडलेले प्रश्न या मुलाखतीत विचारणार असे राज ठाकरे यांनी सुरुवातील जाहीर केले. मात्र मुलाखतीतील अधिक भाग हा ठाकरे कुटुंबीय, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी आण...

अमृताताई तुमच्या 'जाण'कारीसाठी

Image
प्रसंग १ : अनिता बिज्या वसावे रा . चिवलउतार ता . अक्कलकुवा , जि . नंदुरबार आपले डी . एड . संपवून नोकरीच्या शोधात होती . तिची नेमकी गरज ओळखू एका ख्रिश्चन प्रचारीकेने तिला एस . ए . मिशन या शाळेत नोकरी दिली . आई - वडील तिच्या नोकरीने सुखावले गेले असता अचानक काही दिवसांनी २८ नोव्हेंबर २०१६ ला तिचा , भावाला पाँडिचेरीहून फोन आला व तेथून परत येण्याकरिता भावाला ३००० रुप याची तिने मागणी केली . भावाने तिच्या म्हणण्यानुसार पैसे पाठविले व १७ डिसेंबर २०१६ ला परत येणार असल्याचे तिने कळविले देखील, मात्र अनिता घरी परतली नाही . अचानक ९ डिसेंबर २०१६ ला आरशी तडवी नावाचा इसम अनिताच्या घरी जाऊन आई - वडिलांना पाँडिचेरी येथे घेऊन गेला . तेथे जाऊन लक्षात की अनिताचा मृत्यू झाला आहे . पालकांनी मृत्यूची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली . तसेच तिच्या प्रेताला देखील हात लावू दिला नाही , आणि प्रेताचे अंतिमसंस्कार वनवासी परंपरेनुसार न करू देता जबरदस्तीने ख्रिश्चन पद्धतीने करण्यास भाग पाडले . हताश पालक पाँडिचेरी येथे कुठलीही कायदेशीर कारवाई करू शकले...

प्रश्न केवळ मंदिराचा नाही, खरा प्रश्न आमच्या आदर्शांचा

Image
अनेक वेळेला राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा ऐकली आहे. "मंदिर तेथेच बनले पाहिजे", पासून तर, "छे छे मंदिराने कुणाच्या ताटात भाकरी येणार का? मग कशाला त्याच्या भानगडीत पडायचे," इथपर्यंतचे सर्व तत्वज्ञान ऐकायला मिळते. परंतु मूळ प्रश्न शिल्लक राहून जातो तो म्हणजे, आपल्या आदर्शांचा.... मंदिराचा आणि आदर्शांचा काय संबंध? असा देखील प्रश्न कुणाला पडू शकेल. परंतु असा प्रश्न निर्माण होणे म्हणजेच या देशाच्या मूळ आदर्शापासून थोडे अंतर बाळगण्यासारखे आहे. म्हणजे, मी जेव्हा जेव्हा शिवरायांचा पुतळा पाहतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या गड-किल्ल्यांवर गेल्यानंतर मनात हिंदवी स्वराज्यासारखे देशासाठी कालानुरूप काहीतरी करण्याचा विचार स्पर्श करून जातो. मी शिवरायांचे चरित्र पुस्तकात वाचले आहे, त्यांच्या सगळ्या कथा मला तोंडपाठ आहेत, त्यांच्यावर आधारित मालिका, नाटक, डॉक्युमेंट्री सगळ्या मी पहिल्या आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड इत्यादी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकी ज्ञानापेक्षा एक वे...

गुळगुळीत गोट्यांकडून सणसणीत

Image
-   हर्षल कंसारा    कालचा लोकसत्ताचा संघ आयोजित ज्ञानसंगमावरील अग्रलेख वाचला. सुरुवातीला थोडा विचार केला की, खरच संघातून एकही संशोधक, विचारवंत कसा तयार झाला नाही? ९० वर्षे लोक संघटीत करून कार्यकर्त्यांना केवळ नंदीबैलासारखे संघ वागवत होता का? असा प्रश्न मनात आला. पण अचानक लक्षात आले की, गेल्या ९० वर्षात एखादे ऑलम्पिक मेडल आणेल असा खेळाडू देखील संघाने तयार केला नाही. दररोज शाखेत २५ मिनिटे खेळ घेऊन देखील! मग पुन्हा लक्षात आले की, एखादा मोठा शिक्षण महर्षी म्हणता येईल असा शिक्षणसम्राट देखील तयार केला नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघाचा स्वयंसेवक म्हणवता येईल, असे एकही शंकराचार्य नाहीत. अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, देशातील एखादा नामवंत उद्योजक संघ घडवू शकला नाही. खरच संघात घडले ते केवळ नर्मदेचे गोटे..! परंतु लोकसत्तेचे एकांगी समीक्षण वाचून मत बनवले तर मी देखील तथाकथित संघाद्वेशी पुरोगामी गोटा ठरेल. संघाची स्थापना झाली तेव्हाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कदाचित या प्रश्नांचे उत्तर मिळू शकते (अर्थात तेवढ्या प्रामाणिकतेने या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर) भार...

तेवढेच शुद्ध तेवढेच सात्विक - भाग १

गेल्या वर्षी विजयादशमीला नागपूर जाण्याचा योग आला. मा. मनमोहनजींना(मनमोहनजी वैद्य, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख) भेटण्यासाठी वेळ मागितला होता तेव्हा, "नागपूरला ये , तेथे निवांत भेटता येईल." असे मनमोहनजी म्हटल्यामुळे नागपूर जाणे पक्के झाले. विजयादशमीला नागपूर जाणे म्हणजेच रेशीमबागेतला उत्सव पहायला मिळणार, आणि  रेशीमबागेतला विजयादशमी  उत्सव बघण्याचा योग काय असतो, ते संघ स्वयंसेवक असल्याशिवाय कळणे महाकठीण ...! तरी देखील थोडे समजविण्याचा प्रयत्न करतो. संघाची सुरुवात  नागपूर पासून झालीये, त्यामुळे तेथील संघकाम, प्रत्यक्ष पूजनीय डॉ. हेडगेवारांसोबत काम केलेले अनेक कार्यकर्ते असणारे नगर म्हणजेच नागपूर, थोडक्यात 'संघाची पंढरीच'. अश्या ठिकाणाचा संघ स्थापना दिनाचा उत्सव बघणे म्हणजेच, मन आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तिरी न्हाऊन निघण्यासारखेच असते स्वयंसेवकांसाठी. त्यामुळेच नागपूर जाण्याची मनात Excitement होतीच.    तेथे मनमोहनजी शिवाय माझी कुणाशीच ओळख नाही, ही बाब स्वतः मनमोहनजी जाणून असल्यामुळे, माझी सकाळी थांबण्याची व्यवस्था, स्टेशन जवळ घर असलेल्या एका का...

पूरस्कार वापसी आणि बरचं काही

Image
आज तसा निवांत वेळ होता, रविवार असल्यामुळे आँफिसला सुट्टी, त्यामुळे लवकर उठणं, तयार होऊन गाडी पकडणं अशी कसलीही गडबड नव्हती. म्हणूनच वाटलं थोड्या बातम्या बघाव्यात. जगात कुठला प्रश्न हँश टँग(#) वर आहे हे जाणण्याचे उत्तम साधन आहे मिडिया. म्हणूनच टि. व्ही. वर बातम्या सुरु केल्यात सुरुवातीस दुरदर्शनचे डि. डि. न्यूज लागले, त्यातील बातम्या बघुन लक्षात आले कि देशात प्रचंड प्रगती होतेय, युवाशक्तीच्या माध्यामातुन देशाला विकास तसेच प्रगतीपथावर नेणे शक्य आहे, नवीन सरकारची कामं पण जोरात सुरु आहेत. कुठे दुर्गम भागात पक्का रस्ता निर्माण करणे सुरु आहे, तर कुठे देशाचा GDP जोरात वाढत चाललाय. भारत जगातील अनेक नवनवीन देशांशी आपले संबंध दृढ करुन जागतिक पातळीवर आपले एक अनोखे स्थान निर्माण करतोय. जागतिक व्यापाराच्या अनेकानेक   संधी भारतात दाखल होताना दिसताय, तर कधी नवत भारतातील श्रीमंत लोकं Give_It_Up च्या माध्यमातून स्वत:हून गरिबांसाठी आपली गँस सबसिडी   सोडताय.   हे सगळं डि. डि. न्यूज वर पाहून मनाला प्रचंड समाधान लाभले. आपला देश नक्कीच प्रगती पथावर मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास निर्...