Posts

Image
तुम्हारे कदम... धीरज रखकर चलते है जो पावस बनकर ढलते है जो एक दिशा को सम्मुख रख चिर-निरंतर बढ़ते है जो धुप-छाव में हसते है जो है अडिग, पर आस्ते है जो आसमान छूने की चाहत के संग सदा जमीनपर बसते है जो चलते हुए न थकते है जो पीछे मुड़कर न देखते है जो अपनी धुन मै मस्त हो कर दुनिया मुठ्ठी मै रखते है जो - हर्षल कंसारा

आशा.....

Image
आशा..... एक ऐसी चीज, जो कुछ न होने पर भी बहुत कुछ दिलाती है यद्यपि बहुत कुछ होते हुए, इसी की कमी से जिंदगी रूठ सी जाती है इसके होने से जिंदगी में हरियाली होती है छायी अभाव से इसके, उखड़ी उखड़ी लगे जीवन की परछाईं संग हो इसके, तो हर पल लगे सुनहरा जिससे जीवन को अर्थ मिल पाये गहरा कभी कभी मैं सोचता हु.... शायद यह न होती, तो जिंदगी का कल न होता कितनी सारी खुशियों से, मेरा कभी मेल न होता मेरा होना भी इस के होने से बन रहा है बाकी तो सब मिथ्याभिमान तन रहा है - हर्षल (On Mumbai-Pune Express way)

विचारांना काय लागते?

Image
विचारांना काय लागते? थोडी पार्श्वभूमी, थोडासा ध्यास थोडे स्वप्न, थोडा अभ्यास थोडी लागते आशा, थोडी निराशा ही थोडी पाहिजे आभा, थोडी अभिलाषा ही थोडे क्षण लागतात आनंदाचे, अभिमानाचे, उत्साहाचे  थोडे प्रसंग हवे दुःखाचे, अपयशाचे, निरुत्साहाचे थोडे असावे सहमतीचे, थोडे असहमतीचे ही थोडी हवी गती, ज्याने विचार नवा आकार घेई थोडे बाळगावे मुद्दे, थोडे प्रसंग थोडी असावी जिद्द, थोडा व्यासंग थोड्या थोड्या गोष्टींतून, विचाराचा जन्म होतो थोडे पडत थोडे धडपडत, तोही परिपक्व होतो - हर्षल कंसारा

आठवणीतले वडाळकर बाबा ….

Image
आज अनेक दिवसांनी काहीतरी लिहायची इच्छा होत आहे. विषय देखील तसाच आहे. वडाळकर सर गेल्याची बातमी ऐकली, मनाला जणू चटका बसल्यासारखे वाटले. काही व्यक्ती अश्या असतात कि ज्यांच्या केवळ असण्याने सुद्धा प्रेरणा मिळत असते, प्रत्येक वेळी संवादाची आवश्यकता असतेच असे नाही. माझ्यासाठी असेच एक व्यक्तिमत्व वडाळकर सरांच्या रूपाने होते. दरवेळी आमचा संवाद होत असे, असे नव्हते, मात्र त्यांना सहज भेटून देखील मला प्रेरणादायी वाटत असे. त्यांना आम्ही बाबा म्हणून संबोधत होतो. (खान्देशात बाबा शब्द आजोबा या भावार्थाने वापरला जातो. ) असे आमचे वडाळकर बाबा गेल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाले. दोन दिवसांपासून मन बैचेन होऊन त्यांच्याबद्दल सतत विचार करत आहे, आणि त्या विचारांना कुठेतरी व्यक्त करायला वाट व्हावी म्हणून लिहायला घेतले. वडाळकर बाबांशी माझी ओळख तशी संघाच्या शाखेत झाली. ५ वी - ६ वीत असताना त्यांच्या बालाजी वाड्यात आमची संघाची शाखा भरत असे. लहानपणी खेळाचे, गोष्टींचे ऐकण्याचे आकर्षण असल्यामुळे स्वाभाविक शाखेची ओढ लागली, आणि हळू - हळू मी संघमय कधी झालो कळलेच नाही. त्यात प्रारंभीच्या काळात महत्वाची भूमिका ...

आरोप नवे, पण तथ्य....?

आपल्या देशात स्वतःचे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी संघ आणि हिंदुत्वाला दुय्यम, तुच्छ, किंवा धूर्त लेखणे खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पुरोगामीत्वाच्या दुकानद...

....तो लिबरल हो तुम

Image
दिलों में अपने तुम मोदी को गालिया देते जी रहे हो , तो लिबरल हो तुम नजर में आरएसएस को आतंकिया समझते जी रहे हो , तो लिबरल हो तुम जेएनयु के बच्चों की तरह आझादी मांगना सीखो तुम एक सेक्युलर के जैसे अल्पसंख्यकों का तुष्टिकरण करना सीखो हर एक रोहिंग्या से मिलो खोले अपनी बाहे हर एक समा पंडितों को जो कश्मीर से निकालना चाहे जो अटल को श्रद्धांजलि देते हुए भी मोदी को गालिया दे रहे हो , तो लिबरल हो तुम   -         हर्षल कंसारा # Kansarastra

जर असते इंटरनेट महाभारत काळात....

Image
जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर नसते गेले श्रीकृष्ण द्रौपदीच्या चीरहरणात, तिच्या बचावला.. त्यांनी देखील केला असता डी.पी. आपला ब्लॅक नसता घडला द्यूताचा तो खेळ... ऑनलाईन मिटिंगनेच कदाचित साधला असता मेळ दु:शासनाने देखील डायरेक्ट वस्त्र हरणाऐवजी तिला केले असते ट्रोल... #द्रौपदी हॅशटॅगचे, त्यासभेत निराळेच असते मोल धृतराष्ट्राने कदाचित ट्विट करूनच केली असती घटनेची ‘कडी निंदा’ आणि केवळ बोर्ड घेऊनच उभी राहिलेली गांधारी म्हटली असती "मैं शर्मिंदा... मैं शर्मिंदा... " जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर खरोखर झाले असते का हो युद्ध...? की व्हर्च्युअल जगात कौरव पांडवांची सायबर सेल झाली असती कटिबद्ध? ब्रम्हास्त्र देखील ठरले असते हॅकींग पुढे फोल... कुरुक्षेत्रातील फेसबुकने अनेकांचा डेटा, विकला असता कवडीमोल आणि केंब्रीज अॅनालिटीकाने त्यामध्ये नक्कीच केला असता झोल... तुटलेल्या चाकाचा रथ कर्णाने olxवर दिला असता विकून... आणि अभिमन्यूने देखिल चक्रव्यूह यूट्यूबवरुन घेतले असते ना शिकून... जर असते इंटरनेट...