Posts

घरटे

Image
सांजवेळी सूर्यास्ताला नभ केसरी रंगला घरट्याची तव ओढ लागे बघा पाखराला पाखराचा जीव रमे त्या इवल्याशा घरट्यात उंच नभातून मोर्चा वळे दाट माळरानात कुठल्याश्या फांदीवरी घरटे त्या पाखराचे कोसावानी आकार जरी इमले त्याच्या स्वप्नांचे! दाना-पाणी-चारा-काडी यातून बनले घरटे खुले असे नभ जरी मन येथेचं रमते जीव विसावतो येथे, क्षुधा येथे क्षमते लळा स्वकियांचा जेथे, तेथे भीती सारी संपते! वात्सल्याची छाया असे, असे आप्तांची माया  प्रेम, लळा, जिव्हाळा ही तर घरट्याची किमया!! - हर्षल कंसारा

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....

Image
आयुष्याचा झालाय लॉकडाऊन सिच्युएशन झालीये हँग कोरोनाचा व्हायरस नव्हे हा तर देवाचा प्रँक.... हव्यासापोटी केलीस तू निसर्गाची हानी उघडे पाडलेस जीव, बेघर केले प्राणी रानं-वनं जाळून आणली औद्योगिक क्रांती वासनांधतेमुळे तुझ्या सृष्टीचक्राची रे भ्रांती  तुझ्या ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वाजलाय व्यवस्थांचा बँड कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....१ लाईफस्टाईलच्या नावाने केल्यात कैक कामना क्वारंटाईनमध्ये लपशिल कुठवर? कर निसर्गाचा सामना! अणु - रेणूच्या आविष्काराने बनवलेत मिसाईल हॅकिंगास्त्राने अनलॉक केल्यात कंप्युटरच्या फाईल पण निसर्गाची किमया पाहा... अदृश्य एका विषाणूने केली तुझी दिनचर्या हँग कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....२ तुझ्या या वागण्यात आता सुधारणा कर निसर्गाचं ओरबडण्यापेक्षा,घाल त्यात भर  प्रदूषणाच्या विळख्यातून कर भुमातेला मुक्त अनावश्यक टाळ, गरजेपुरते घे फक्त साधी जीवनशैली अंगिकारून वाढव मानवतेचा रँक कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....३ - हर्षल कंसारा

मधुबन अंबर

Image
चांद सी जगमगाती, शीतल, सुंदर बादलों की परछाई से छुपकर आगे आगे बढ़ती जाती,  रातें कटती, बाते चलती उस चंद्रकिरण की रोशनी में! फिर चांद भी मुस्कुराकर खिल उठा उस प्रेम गीत पर चांदनी नाचे उसी धुनपर आज बना, मधुबन अंबर उस नित नए आंगन में ! - हर्षल

कौरवसेनेचा टाहो

Image
दुर्योधनाची मांडी फोडताच, कौरवसेना अधर्म-अधर्म ओरडायला लागली अभिमन्युला चक्रव्युहात अडकवून तहान ज्यांची होती भागली!! साधन-शुचीतेचे पुराण ज्यांना आता लागले आहे आठवू चित्रगुप्ताला ही पडला असेल प्रश्न, त्यांना नेमके कुठे पाठवू? चिरहारण होणाऱ्या सभेत भिष्मासम राहिले होते मौन पांचालीचा अपमान तेव्हा वाटला होता गौण अबला द्रौपदीला पाहून, सभेत शड्डू जेव्हा ठोकला होता हे राधासुता तेव्हा तुझा धर्म नेमका कुठे भरकटला होता? #Kansarastra

शस्त्र विक्रेता, शिकारी आणि जंगल

Image
गंधक आणि अंदक या दोन देशांच्या सीमेवर घनदाट जंगल होते. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात अनेक पशु-पक्षी आनंदाने बागडत असत. जंगलातील मुबलक पाण्यामुळे पशु-पक्ष्यांना अनुकूल आणि पोषक वातावरण असे. पक्ष्यांना दाणा-पाणी, पशूंना भरपूर आहार या सगळ्यामुळे हे जंगल आनंदाने बहरले होते.  परंतु, अचानक एके दिवशी दोन्ही देशांमध्ये जंगलावरून वाद निर्माण झाला आणि सरते शेवटी उपाय म्हणून जंगल अर्धे-अर्धे वाटून घेण्याचा तह झाला. तसेच या जंगलातील जैवविविधतेच्या संरक्षणाचा देखील करार झाला. या करारानुसार दोन्ही देश आपापल्या हद्दीतील प्राण्यांचे रक्षण आणि संवर्धन करतील असे ठरले.  कराराला २० वर्षे लोटली. त्यानुसार गंधक देशातील जैवविविधतेत जवळपास पन्नास टक्के वाढ झाली, तसेच तेथील प्राण्याच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. मात्र अंदक देशाने कराराचे प्रामाणिक पालन केले नाही. तिथे शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला. विविध शिकाऱ्यांनी मिळून त्या जंगलातील प्राण्यांची एक-एक प्रजाती समूळ नष्ट केली. अनेकांनी झाडं कापून वस्त्या निर्माण केल्या. परिणामी, तेथील प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. शिकारी...

सकलेश्वराचे मंदिर

Image
आज एका खाजगी कामानिमित्त अंबाजोगाई येथे येणे झाले, योगेश्र्वरी देवीचे तीर्थक्षेत्र असलेले अंबाजोगाई गाव तसे खूप प्राचीन आहे, म्हणजे ८ व्या शतकातील चालुक्य साम्राज्यात देखील या नगरीचा उल्लेख आढळतो. गावात हिंडत असताना येथे साधारणतः दीड वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात काही मूर्ती सापडल्याचा संदर्भ आला, मग काय, त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. माननीय शरदराव हेबाळकर यांनी त्याबद्दल माहिती सांगितली आणि सायंकाळी त्याठिकाणी भेट द्यायला गेलो. सकलेश्वर महादेवाचे जीर्ण स्वरूपातील हेमाडपंथी मंदिर अंबाजोगाई शहराच्या २ किलोमीटर अंतरावर आहे. साधारणतः बाराव्या शतकातील हे मंदिर यादवांचा राजा जैत्रपाल याची राजधानी अंबाजोगाई असताना, त्या काळात उभारले गेले आहे. मंदिराला भेट दिल्यावर लक्षात येते की, येथे त्याकाळी ४-५ मंदिरांची उभारणी केली असावी, आज तेथे एकच मंदिर त्यांपैकी शिल्लक आहे, बाकी सर्वांचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले आहेत. दीड वर्षांपूर्वी एका शेतात काही बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू केले असता स्थानिकांना काही मुर्त्या आढळून आल्या, त्यामुळे इतर ठिकाणीही उत्खनन सुरू केले तर...

तुम्हावर केली मी मर्जी बहाल

Image
तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ शरद पवार सत्तेची तोरणं बांधून मातोश्रीवरती ही डरकाळी बेगडी, उधळीते काळजातली भीती जवळी यावं मला पुसावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम खुशाल गुरगुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटल सत्तेचं कोडं विरह जाळीता मला लाचारी पत्कारली मी खुशाल मॅडम मॅडम अदबीनं तुम्ही विनवता सोनियाबाई स्वाभिमानाचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच न घालवावी रात साजणा, कधीतरी व्हावी सत्तेची सकाळ #Kansarastra